Home Movies चंद्रमुखी चित्रपटाचा टिझर आला समोर…पण ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

चंद्रमुखी चित्रपटाचा टिझर आला समोर…पण ही भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कोण?

5252
0
chandramukhi marathi actress
chandramukhi marathi actress

हिरकणी चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर प्रसाद ओक दिग्दर्शित “चंद्रमुखी” चित्रपटाचे ऑफिशियल टिझर नुकतेच लॉंच झालेले पाहायला मिळाले. प्लॅनेट मराठी, अक्षय बरदापुरकर, आणि गोल्डन रेशो यांची निर्मिती असलेल्या तसेच अजय अतुल यांची संगीताची साथ लाभलेल्या या चित्रपटात गायिका प्रियांका बर्वे हिच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे चित्रपटाच्या गाण्यांविषयी प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होताना दिसत आहे. गेल्या वर्षी चित्रपटाचे एक पोस्टर लॉंच झाले होते त्यावरून ही चंद्रमुखी नक्की आहे तरी कोण याबाबत अनेक तर्क लावण्यात आलेले पाहायला मिळाले. बहुतांश प्रेक्षकांनी ही अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच असावी असा खात्रीशीर तर्क लावला असला तरी याबाबत चित्रपटाच्या टीमने अजूनही गुप्तता बाळगलेली दिसून येते.

chandramukhi marathi film actress

हिरकणी चित्रपटात प्रसाद ओक ने सोनालीला प्रमुख नायिका साकारण्याची संधी दिली होती या चित्रपटाच्या यशानंतर पुन्हा एकदा सोनाली चंद्रमुखीच्या प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार असे भाकीत वर्तवले जात आहे यासोबतच अभिनेत्री सायली संजीव हिने देखील या चित्रपटाचे टिझर शेअर केले आहे त्यामुळे सायली संजीव चंद्रमुखी साकारणार का? अशीही चर्चा जोर धरताना दिसत आहे हे सर्व भाकीत वर्तवले जात असतानाच एक खात्रीशीर बाब समोर येत आहे. आणि ती बाब म्हणजे या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच सासवड येथे पार पडले यावेळी अभिनेत्री “प्राजक्ता माळी” आणि “अमृता खानविलकर” यांना तेथे काम करताना पाहिले गेले. त्यामुळे चंद्रमुखीच्या भूमिकेत अमृता खानविलकर किंवा प्राजक्ता झळकणार याबाबत खात्री दिली जात आहे येत्या काळात चंद्रमुखीच्या नायिकेबाबत योग्य तो उलगडा होईलच पण त्याची उत्सुकता तोपर्यंत तरी कायम राहील एवढे मात्र नक्की. विश्वास पाटील यांच्या “चंद्रमुखी” साहित्यकृतीवर हा चित्रपट आधारित असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसादने या साहित्यकृतीवर चित्रपट बनवण्याची ईच्छा व्यक्त केली होती परंतु त्याला परवानगी मिळत नव्हती. कच्चा लिंबू आणि त्यानंतरच्या हिरकणी चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर विश्वास पाटील यांनी चंद्रमुखी वर चित्रपट बनवण्याची प्रसादला परवानगी दिली. साधारण गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली मात्र त्यातील कलाकारांची नावे त्यांनी गुलदस्त्यात ठेवणेच अधिक पसंत केले आहे. दोन दिवसांपूर्वी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पहिला टिझर लॉंच करण्यात आला असून यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजेच ५ नोव्हेंबर २०२१ रोजी “चंद्रमुखी” हा चित्रपट प्रदर्शित होईल असे जाहीर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here