बिग बॉस मराठी सीजन ३ सुरु होऊन जवळपास १ महिना उलटत आला. सुरवातीलाच कीर्तनकार शिवलीला पाटील ह्यांनी बिगबॉसच्या घरात पदार्पण केलं त्यामुळे सुरवातीपासूनच शो चा टीआरपी चांगलाच वाढला. कीर्तनकार शिवलीला पाटील ह्यांच्या अपोझिटला तृप्ती देसाई ह्यांना देखील घरात एंट्री मिळाली. तर इकडे स्नेहा वाघ हीच डिव्होर्स होऊन देखील एकाच शो मध्ये तिचा पहिला पती आविष्कार आणि स्नेहा ह्या दोघांची एंट्री झाली. एकूणच काय तर अश्या स्पर्धकांमुळे एकमेकांतील वाद विवाद उघड होतात त्यामुळे शो पाहणाऱ्यांची संख्या देखील वाढते. वादग्रस्त विधाने आणि आयुष्यातील जुन्या कहाण्या तसेच अडचणी लोकांना पाहायला आवडतात हे काही खोटं नाही हेच ह्यावरून सिद्ध होत.

बिगबॉसच्या घरात येताना अभिनेत्री स्नेहा वाघ हिने आपला दुसरा पती किती छळ करत होता ह्याची कहाणी सांगितली होती. सोशिअल मीडियाच्या माध्यमातून तिच्या दुसऱ्या पटीने मी तुझ्यासोबत काही चुकीचं केलं नाही आणि तरीही तू माझा छळ केला असं म्हणतेस तर मला त्याचा एकतरी पुरावा दे असं म्हणाला होता. महेश मांजरेकर यांनी स्पर्धकांची पुन्हा एकदा शाळा घेतली तेंव्हा आविष्कार दार्वेकर हा कमजोर सदस्य असल्याच महेश मांजरेकर यांनी सांगितलं. महेश मांजरेकर यांच्या विधानाने आविष्कार दुखावल्याचं पाहायला मिळाला यावेळी स्नेहाला पाहताच आविष्कारने स्नेहाकडे जाऊन तिला मिठी मारली आणि तिची माफी मागितली. यावेळी हे एक्स कपल एकत्र दिसल्याने अनेक चर्चा सुरु झाल्या घरगुती हिंसाचारामुळे स्नेहा आणि आविष्कारचा घटस्फोट झाला होता. पण आता हे पुन्हा एकत्र येणार कि काय असं वाटू लागताच स्नेहा वाघाने चक्क बिगबॉसच्या घरातच पहिला पती अविष्कार मला मारायचा माझा छळ करायचा असा उल्लेख केला त्याने कितीही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तरीही मी त्याला मुळीच जवळ करणार नसल्याचंही तिने सांगितलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्नेहा वाघ आपल्या पहिल्या आणि दुसऱ्या दोघी पतींची बदनामी करते पण आता तीच जयच्या मागेपुढे करताना पाहायला मिळतेय.

बिगबॉसच्या घरात हे सगळे एकत्र असताना जय आणि स्नेहाच्यात प्रेमाचे वारे वाहताना पाहायला मिळतेय. ह्यावर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवलेली पाहायला मिळतेय. आपला पती जो आता विभक्त झाला आहे तो त्याच घरात असताना त्याच्याच समोर स्नेहा आणि जय ह्यांची जवळीक पाहायला मिळतेय हे कसं शक्य होऊ शकत असा सवाल देखील प्रेक्षक विचारताना दिसतात. हेच नाही तर बिगबॉसच्या आधीच्या सिजनमध्ये देखील राजेश श्रीनगरपुरे आणि अभिनेत्री रेशम टिपणीस ह्यांची जवळीक पाहायला मिळाली होती. हे दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा देखील रंगल्या होत्या. पण हे स्पर्धक घरातून बाहेर गेले कि ह्यांच्यात असं काही पाहायला मिळालं नाही. त्यामुळे हे सगळं स्क्रिप्टेड असल्याचं प्रेक्षक बोलताना पाहायला मिळत. बिगबॉसच्या घरात टीआरपी वाढावा म्हणूनच अभिनेता आणि अभिनेत्रीची जवळीक वाढवत असल्याच भासवून हा शो टीआरपीत प्रथम स्थानावर येतो हि लाजिरवाणी गोष्ट आहे. स्नेहा आणि जय ह्यांची जवळीक पाहता आता हेच पाहायचं बाकी होत म्हणत प्रेक्षक नाराजी दर्शविताना पाहायला मिळत आहेत.