महेश कोठारे कुटुंबाची चौथी पिढी म्हणून त्यांची नात जिजाकडे पाहिले जात. अर्थात तीही अभिनय क्षेत्रातच आपले करिअर करेल अशी चर्चा देखील तिच्या जन्मापासूनच वर्तवलेली पाहायला मिळते. महेश कोठारे यांची आई जेनमा, वडील अंबर कोठारे हे देखील मराठी सिने नाट्य सृष्टीतील जाणते कलाकार. महेश कोठारे यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा आदिनाथने देखील करिअर म्हणून अभिनय क्षेत्र निवडले. याच कारणाने जिजा देखील याच क्षेत्रात आपले करिअर घडवेल अशी आशा आहे.
mahesh kothare family
परंतु महेश कोठारे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या नातीने जिजाने करिअर म्हणून अभिनय क्षेत्र न निवडण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. जिजाने पुढे जाऊन अभिनय क्षेत्र न निवडता वर्ल्ड फेमस टेनिस प्लेअर बनून आपले नाव चमकवावे अशी ईच्छा महेश कोठारे यांनी व्यक्त केली आहे.महेश कोठारे असेही म्हणतात की आदिनाथने करिअर म्हणून कोणते क्षेत्र निवडावे यावर मी कुठलीच बंधने लादली नाहीत. माझा छकुला चित्रपटात एक बालकलाकार म्हणून मी त्याला संधी दिली होती त्यानंतर त्याने एमबीएचे शिक्षण पूर्ण केले. परंतु पुढे जाऊन अभिनयाची आवड निर्माण झाल्याने त्याने करिअर म्हणून हेच क्षेत्र निवडले. जिजाने देखील करिअर म्हणून कोणते क्षेत्र निवडावे हा तिचा प्रश्न आहे मी केवळ माझी ईच्छा व्यक्त केली आहे. सानिया मिर्झा, स्टेफी ग्राफ ही नाव जशी जगप्रसिद्ध आहेत त्याचप्रमाणे जिजाने देखील अशीच प्रसिद्धी मिळवावी.