डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून एका मागून एक मराठी कलाकार विवाह बंधनात अडकताना पाहायला मिळत आहेत. मालिकेतील राणा आणि अंजली म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या लग्नानंतर अनेक कलाकार ह्याच महिन्यात लग्नगाठ बांधताना पाहायला मिळाले. बाळू मामाच्या नावानं चांगभलं या लोकप्रिय मालिकेतील अभिनेता सुमित पुसावळे याची देखील लग्नाची लगबग आतापासूनच सुरू झालेली पाहायला मिळत आहे. १४ डिसेंबर २०२२ रोजी म्हणजेच येत्या बुधवारी सुमितच्या लग्नाचा सोहळा थाटात पार पडलेला पाहायला मिळणार आहे. याच्या लग्नासोबत त्याच दिवशी १४ तारखेला आणखीन एका मराठी अभिनेत्याचं लग्न होणार आहे. पावनखिंड, फर्जंद अश्या चित्रपटात आणि अनेक मराठी मालिकांत गाजेलला अभिनेता हरीश दुधाडे हा देखील विवाह बंधनात अडकणार आहे.

अभिनेता हरीश दुधाडे याचा नुकताच साखपुडा झाला आहे. लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये त्याचा हा साखरपुड्याच्या सोहळा संपन्न झाला आहे. हरीश दुधाडे हा लवकरच मॉडेल असलेल्या “समृद्धी निकम” हिच्याशी लग्न गाठ बांधणार आहे. अनेक मराठी कलाकारांनी ह्यांच्या साखरपुड्यात डान्स देखील केलेला पाहायला मिळाला. चित्रपटात छोटी पण तितकीच महत्वपूर्ण भूमिका त्याने बजावली होती. अभिनेता हरीश दुधाडे हा मूळचा अहमदनगर जिल्यातील आहे. आणि त्याची होणारी पत्नी हि देखील अहमदनगर जिल्यातीलच आहे. नगरहून पुण्याला येऊन त्याने आपलं नशीब अजमावल आणि त्यात त्याला यश देखील मिळालं. सुरवातीपासूनच त्याची छाप मराठी प्रेक्षकांवर पडत गेली. नकळत सारे घडले, माझे मन तुझे झाले, तू सौभाग्यवती हो, तुमची मुलगी काय करते, सरस्वती अश्या नाईक मालिकांतून अभिनेता हरीश दुधाडे प्रेक्षकांच्या भेटीला आला. नाटक, मालिका आणि चित्रपट साकारणारा हरीश दुधाडे आता चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. असो अभिनेता हरीश दुधाडे आणि त्याची होणारी पत्नी समृद्धी निकम याना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…