Home Movies लहानपणी प्रभूदेवा त्याचं ‘हम से है मुकाबला’ मधलं चित्र असलेलं दप्तर घेऊन...

लहानपणी प्रभूदेवा त्याचं ‘हम से है मुकाबला’ मधलं चित्र असलेलं दप्तर घेऊन शाळेत जायचो आज…

2052
0
siddharth jadhav and prabhudeva
siddharth jadhav and prabhudeva

सिद्धार्थ जाधव मराठीतला सुपरस्टार आता बॉलीवूड मधेही आपले पाय रोवताना दिसतोय. फिल्म लाईनची कोणतीही बॅग्राऊंड नसताना आपल्या स्वतःच्या हिमतीवर आणि मेहनतीवर त्याने आज हे शिखर गाठलं. सिद्धार्थचं बालपण अगदी सामान्य घरात गेलं. दिसणं आणि वागण्यातून तो पुढे हिरो होईल असं कोणाला वाटंनं देखील अश्यक्य. पण आयुष्यात अशक्य हा शब्द काढून पॉसिटीव्ह थिंकिंग ठेऊन मेहनतीनं काम केलं तर अशक्य गोष्ट देखील शक्य आहे हे सिद्धार्थ जाधवनं करून दाखवलाय.

सिंबा चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर आता सिद्धार्थ बॉलिवूडच्या आणखीन एका दमदार चित्रपटात लवकरच पाहायला मिळणार आहे. नुकतंच त्याने आपल्या फेसबुक अकाउंटवर तशी पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये तो प्रभुदेवा ह्यांच्यासोबत एका मंदिराच्या पायरांजवळ पाहायला मिळतोय. फोटोत दोघे चर्चा करताना देखील पाहायला मिळतायेत. ह्या पोस्ट मध्ये सिद्धार्थने आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय तो म्हणतो ” प्रभूदेवा….त्याचं ‘हम से है मुकाबला’ मधलं चित्र असलेलं दप्तर घेऊन शाळेत जायचो, दप्तरावरचं चित्र जिवंत होऊन समोर येईल असं कधी स्वप्नातही पाहिलं नव्हतं.. पण यावेळेस दप्तरावरचं स्वप्न घेऊन जगणाऱ्या मला दप्तराच्या बाहेरच खूप काही शिकायला मिळालं.. कलाकार म्हणून नेहमीच वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनाखाली काम करायची संधी मिळत असते.. आणि मी ती संधी सहसा सोडत नाही.” ह्या फोटोवर सिद्धार्थच्या चाहत्यांनी लाईक्स चा वर्षाव केलेला पाहायला मिळाला. विशषे म्हणजे अनेकांनी मंदिरात जाताना त्याने आपले बूट खालीच काढलेले दिसतात. बूट आणि चप्पल घालून मंदिरात प्रवेश केला तर मंदिरातील पवित्रता भंग होते.. दादा तुम्ही पवित्रता राखली छान अश्या सुंदर कमेंट देखील पाहायला मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here