झी मराठीने सादर केलेल्या सारेगमप लिटिल चॅम्पच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर घेतलं त्यामुळे आता पुन्हा झी मराठीने बालगायकांसाठी स्टेज निर्माण केलं. पण ह्या पर्वत अनेक त्रुटी आढळल्या जज हे गायकांना गायनातील त्रुटी निदर्शनात आणून देत नाहीत शिवाय प्रत्येक गायकाला वरचा सा देताना दिसतात. त्यामुळे गाण्याच्या कॉम्पिटिशन मधील मजा निघून जातेय असे अनेकांचं मत आहे. मुलांना प्रेत्साहं नक्कीच द्यावं पण त्याचसोबत त्यांना आणखीन काय करायची गरज आहे हेही तितकंच महत्वाचं आहे त्यातूनच हि मुले पुढे सुधारणा करून आणखीन चांगलं गाणं गाऊ शकतात.

मागच्या आठ्वड्यात गायलेले स्पर्धक खूपच गाजले सगळीच मुलं उत्तम परफॉर्मंस करताना पाहायला मिळतायेत मागच्या आठवड्यात गायलेलं गाणं हि पोरी साजूक तुपातली हे सगळ्यांनीच डोक्यावर घेतलं. इतक्या लहान वयात हावभाव करून उत्तम रित्या गाणं गाणं खूपच अवघड असत पण या पर्वातील सगळीच मुलं आपलं गाणं उत्तम रित्या सादर करताना पाहायला मिळतायेत. ह्या लहानग्या गायिकेचा नाव आहे “स्वरा जोशी”. स्वरा जोशी हि मुंबईची असून मुंबईतील दादर मधील साने गुरुजी इंग्लिश मेडीयम मध्ये ती शिकत आहे. ती आठ वर्षाची असून ३ऱ्या इयत्तेत शिकतेय. स्वरा जोशी हि एक उत्तम गायिका असून ह्यापूर्वीही तिने टीव्ही शो मध्ये गाणे गायले आहे. ह्या पूर्वी ती सोनी मराठी वरील जय जय महाराष्ट्र माझा ह्या कार्यक्रमात बालगायीका म्हणून पाहायला मिळाली होती. ह्या कार्यक्रमात देखील तिने सर्वांचे लक्ष वेधले होते. ह्या व्यतिरिक्त आपल्या आई सोबत तिने अनेकदा स्टेजवर गाण्याचा लाईव्ह शो देखील केला आहे. होय तिची आई देखील एक उत्तम गायिका आहे त्या देखील अनेक कार्यक्रमांत गाणी गाताना पाहायला मिळतात. त्यांच्या बद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. स्वरा जोशी हिच्या आईच नाव आहे केतकी भावे- जोशी. तर वडिलांचं नाव आहे अभिजीत जोशी तेही संगीत क्षेत्राशी निगडित आहेत.

स्वरा जोशीच्या आई केतकी जोशी ह्या एक उत्तम गायिका असून सोनी मराठी वरील जय जय महाराष्ट्र माझा आणि सिंगिंग स्टार या कार्यक्रमात पाहायला मिळाल्या होत्या. त्याचसोबत अनेक मराठी अल्बम मध्ये देखील त्यांनी गाणी गायली आहेत. “मम्मी कि लोरिया” या अलबम मध्ये सोजा बेटा हे त्यांनी गायलेलं अंगाई गीत खूपच गाजलं. आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत स्वरा देखील ह्या क्षेत्रात नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवेल ह्यात शंका नाही. स्वरा जोशी आणि सारेगमप मधील सर्वच बालसिंगरला आमच्या संपूर्ण टीम कडून खूप खूप शुभेच्छा..