Home Entertainment देवमाणूस मालिकेच्या अभिनेत्याने लेखकाचे आभारमानत लिहली भावनिक पोस्ट

देवमाणूस मालिकेच्या अभिनेत्याने लेखकाचे आभारमानत लिहली भावनिक पोस्ट

2067
0
devmanus kiran gaikwad
devmanus kiran gaikwad

देवमाणूस या मालिकेने काही दिवसांपूर्वीच निरोप घेतला आहे मात्र हा निरोप नसून एका नव्या पर्वाची सुरुवात आहे असे मालिकेच्या एक्झिटवरून समजते. त्यामुळे लवकरच या मालिकेचा सिकवल येईल अशी आशा व्यक्त होत आहे. ह्या सर्व चर्चा चालू असताना मालिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाड याने आपल्या भूमिकेबाबत काय म्हणाले आहे ते पाहुयात. मी खुप दिवस झाले हा विचार करतोय कि post लिहावी पण शब्द नव्हते. आज लिहुनच टाकल देवमाणूस सीरियल बघता बघता संपली …..

kiran gaikwad and shweta shinde
kiran gaikwad and shweta shinde

खरतर कुठलाही प्रोजेक्ट तेव्हाच चांगला होतो जेव्हा सगळे जीव तोडुन काम करत असतात माझे सहकलाकार , सर्व तंत्रज्ञ, प्रॉडक्शन टीम, हेअर आणि मेकअप डिपार्टमेंट ते स्पॉट दादां पर्यंत साऱ्यांनी हातभार लावला. देवमाणुस च्या सेटवरचा प्रतेक माणुस जीव तोडून काम करत होता त्याबदल वादच नाही ; कारण रात्री साडे दहा वाजता परदर्शित होणाऱ्या आजवरचया मालीकांचे टीआरपी रेकॉर्डस देवमाणसू ने मोडले. टीआरपीचे रेकॉर्डस नक्कीच आनंद देतात पण त्यापेक्षाही घराघरातले छोटे नी मोठे रात्री जागनू न चुकता देवमाणुस बघु लागले. “या डॉक्टर ला लई हानला पाहेन” “हयों कसला डॉक्टर शैतान हाय ह्यो” “हा डॉक्टर ह्यच्यातर (अपशब्द)“ “खुप सारे meme तयार झाले memers ला पण सलाम यार “आणि मी म्हणतो हीच खरी माझ्या कमाची पावती हा प्रवास खरंच सोपा नव्हता. इतक्या गंभीर विषयाला अत्यंत सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडताना मनात साशंकता नक्कीच होती..पण जशी कागदावर गोष्ट आणण पात्र आकार घेऊ लागली तशा या शंका मनातुन दूर झाल्या. पद्मा मँडम व मालिकेचे लेखक स्वप्निल सर आणि विशाल कदमने कागदावर ही पात्रं जीवंत केली.

devmanus serial team
devmanus serial team

सलाम तुमच्या लेखनीला आणि असे अनेक पात्र तुमच्या लेखनीतुन जन्म घेत राहो आमच्या सरख्या माती ला हो मातीलाच आकार द्यायचा होता आणि त्यासाठी दिग्दर्शक राजु सावंत या शिवाय दुसरं नाव असुंच शकत नाही. अनेक यशस्वी मालिका दिल्यानंतरही राजू सरांचा उत्साह आणि तळमळ पहिल्या कामाइतकीच असते आणि ही देवमाणसू च्या सेटवरच्या प्रत्येकाने अनभु वली. राजू सावंत, अमित सावरडेकर आणि सरांची सेना आमची डिरेक्शन टीम लव यु.. खुप सारे प्रेक्षक असतील ज्यांना माझं काम नाही आवडलं तुम्हाला पण thank यू … मी अजुन प्रयत्न करत राहिन ठरवलं होतं फार बोलायच नाही पण खुप व्यक्त झालो .. फार वेळ घेत नाही … लवकरच कहितरी भन्नाट घेऊन येइनच … जबाबदारी वाढलिए माझ्यावर विश्वास ठेऊन याआधी भैयासाहेब मग डॉक्टर असे दोन पात्र करायला वज्र प्रोडक्शन आणि झी मराठी ने मला संधी दिली त्याबदल तुमचे खुप खुप आभार . मी आशा करतो मी तुमच्या विश्वासास पात्र ठरलो आसेन. लोभ असावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here