अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील घडलेल्या घटनांचा उलगडा विविध मुलाखतींच्या माध्यमातून करताना पाहायला मिळतात. प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार त्यांच्या जीवनातील माहित नसलेल्या गोष्टी ऐकायला चाहत्यांना खूपच उत्सुकता लागून असते. अशीच एक मुलाखत बोल भिडू या यु ट्यूब चायनलने सिद्धार्थ जाधवच्या जीवनावर घेतलेली पाहायला मिळाली. सिद्धार्थ मराठी चित्रपट सृष्टीतला सुपरस्टार बनला आहे. एका गरीब घरातील मुलगा इतका मोठा स्टार कसा बनला हे ऐकण्याची ह्याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच लागून असते. या मुलाखतीत सिद्धार्थ जाधवने त्याच्या आयुष्यातील अनेक चढ उतार सांगितले आहेत. या मुलाखतीत बोलताना सिद्धार्थने “तुंबाड” चित्रपटासाठी त्या दिग्दर्शकाने केलेल्या एका प्रयोगाचा किस्सा देखील सांगितलं आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव म्हणतो “तुंबाड” हा चित्रपट गेल्या काही वर्षात रिलीज झाला. पण त्या चित्रपटासाठी मी २००३, २००४ सालीचा ऑडिशन दिल होत. पण त्यावेळी तो रोल कोणता आहे आणि चित्रपट देखील कोणता आहे हे मला मुळीच माहित नव्हतं. त्यावेळी “लोचे झाला रे” हे नाटक करत होतो. यावेळी तुंबाड चित्रपटाचा दिग्दर्शक राही बर्वे सिद्धार्थला भेटला होता. मुंबईत समर्थ व्यायाम मंदीर आहे तिकडे मोठ्या जिमन्यष्टीक हॉल मध्ये त्याने मला वेगवेगळ्या प्रकारे चालायला सांगितलं होत. त्यावेळी मी दिसायला तसाच होतो कि विदाउट मेकअप. त्याला मी दिसलो होती, नाही म्हणजे तुमच्या दिसण्यावर लोक तुम्हाला त्या कॅरेक्टर मध्ये पाहतात. त्याने चक्क मला एक अंडर वेअर दिली होता ती अंडरवेअर घालून बाजूला एक पिशवी बांधली होती आणि म्हणाला आता वेगवेगळ्या पद्धतीने मला चालून दाखव. तेंव्हा मला नाही कळलं हे सगळं काय आहे कि आपल्याला अश्या चित्रपटात काम करायला मिळेल. अश्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात (हस्तर ) काम करण त्याला नेहमीच आवडलं. राही बर्वे याने नंतर तो चित्रपट केलं पण तो विफएक्सच्या मदतीने केला. हस्तरचा तो सिन पाहिजे तस झाला नाही असं सिद्धार्थ मत आहे.

तुंबडा चित्रपटाने भरघोस यश मिळवलं. आजही हा चित्रपट अनेकजण पाहतात. तुंबाड हा ऑक्टोबर २०१८मध्ये प्रदर्शित झालेला हॉरर चित्रपट आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन राही अनिल बर्वे आणि आदेश प्रसाद ह्यांनी केले होते. मराठी, हिंदी, तामिळ आणि तेलगू ह्या भाषेत देखील तुंबडा प्रदर्शित झाला होता. तुंबाडला बेस्ट पॉडक्शन डिझाईन साठी फिल्म फेअर अवॉर्ड देखील मिळाला होता. या चित्रपसाठी अजय अतुलने म्युजिक दिल होत. ५ करोडचं बजेट असलेल्या तुंबाडने बॉक्सऑफिसवर जवळपास १४ कोटींची कामे केली होती. प्रेक्षकाना हस्तरच्या भूमिकेत सिद्धार्थ जाधवला पाहायला नक्कीच आवडलं असत. अनेक जणांनी सिद्धार्थ ह्या भूमिकेत असता तर चित्रपट पाहायला आणखीन मजा आली असती आणि तो चित्रपट नाखिं जास्त हिट झाला असता असं म्हटलेलं पाहायला मिळत आहे. पण ह्या सगळ्या जर तर च्या गोष्टी आहेत.