Home Natak प्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे

प्रशांत दामले म्हणतो टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे

3680
0
prashant damle actor
prashant damle actor

काही दिवसांपूर्वीच कोरोनाचे गांभीर्य लक्षात घेता प्रशांत दामले यांनी बॅकस्टेजला काम करणाऱ्या त्यांच्या कलाकारांसाठी मदतीचा हात म्हणून प्रत्येकी दहा हजार देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाचे कौतुक सर्वच स्तरातून झालेले पाहायला मिळाले. हातावर पोट भरणाऱ्या या कलाकारांसाठीची तळमळ त्यांच्या कृतीतून दिसून आली. याच तळमळीने त्यांनी आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. देशात कोरोनाच्या सावटामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनतेसाठी एक आवाहन केले.

कोरोनाशी दोन हात करण्यासाठी येत्या २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कोणीही घराबाहेर पडू नये, असे एक आवाहन केले. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत अनेकांनी केलेले आहे, यातच प्रशांत दामले यांनी देखील ‘ भारताच्या पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार मी आणि माझे कुटुंबिय २२ मार्च रोजी घराबाहेर पडणार नाही. हे आवाहन प्रत्येक भारतीय नागरिकांच्या भल्यासाठी आहे. आपल्याला कोरोनाचा त्रास होऊ नये म्हणून आपल्यातील काही मंडळी २४ तास काम करणारी आहेत त्यांचं प्रत्यक्ष कौतुक करू शकत नाही म्हणून संध्याकाळी त्यांच्यासाठी ५ वाजता टाळ्याही वाजवणार आहे… टाळ्यांची किंमत मला चांगलीच ठाऊक आहे’. आपली कला सादर करून झाल्यावर एका कलाकाराला ह्या टाळ्यांची किंमत काय असते हे त्या कलाकाराला चांगलेच ठाऊक असते. त्यामुळे आपणही आपल्या परीने देशाच्या भल्यासाठी पंतप्रधानांनी घेतलेल्या ह्या निर्णयाला टाळ्यांच्या स्वरूपात उस्फुर्त प्रतिसाद देऊन दाद दिली पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here