Home News देवमाणूस मालिकेत मायराला कीडनॅप करण्याची डॉक्टरची नवी खेळी

देवमाणूस मालिकेत मायराला कीडनॅप करण्याची डॉक्टरची नवी खेळी

2290
0
devmanus serial mayra
devmanus serial mayra

देवमाणूस मालिका आता लवकरच एका रंजक वळणावर येऊन ठेपलेली दिसत आहे. मालिकेच्या येत्या भागात डॉक्टर दिव्याला देवीसिंगची केस सोडून दे आणि माझ्याशी लग्न कर असे सांगताना दिसतो. त्यावर दिव्या डॉक्टरला मी देवीसिंगची केस सोडणार नसल्याचे सांगते. दिव्याच्या या निर्णयामुळे आपण पुरते अडकून जाऊ या भीतीने डॉक्टर मायराला कीडनॅप करण्याचे ठरवतो. वेश बदलून डॉक्टर मायराच्या खोलीत जाऊन तिला बेशुद्ध करतो आणि लगेचच पोलिसस्टेशनमध्ये असलेल्या दिव्याला फोन करून ‘गोड मुलगी आहे तुझी एक दोन वेळा पाहिलं आहे मी तिला’ असे म्हणून धम’कावतो.

त्यानंतर डॉक्टर मायराला वाड्यातील आपल्या खोलीत घेऊन येतो. जेव्हा ही गोष्ट डिम्पलला समजते तेव्हा ती लगेचच डॉक्टरच्या खोलीत येते. त्यानंतर डिम्पल आणि डॉक्टरमध्ये वाद निर्माण होतो. मायरा शुद्धीवर आली तर माझं काही खरं नाही असे म्हणून डॉक्टर तिला इंजेक्शन द्यायला जातो तेवढयात डिंपल डॉक्टरला तसे करण्यास नकार देते तिच्या वाट्याला जाऊ नका म्हणत डॉक्टरला ती धक्का देते. डिम्पलच्या धक्क्याने डॉक्टर जवळच असलेल्या टेबलवर जाऊन आदळतो आणि यामुळे डॉक्टरच्या डोक्याला दुखापत होते. आता डॉक्टर डिंपल आणि मायरालाही संपवेल का अशी भीती प्रेक्षकांमध्ये निर्माण होत आहे. डॉक्टर मायराचा खू’न करणार की वेगळेच काही घडणार हे येत्या भागातच अधिक स्पष्ट होईल परंतु देवीसिंगचा छडा लावण्याच्या नादात दिव्या स्वतःला तर गमवणार नाही ना ?…अशीही पुसटशी शंका प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहे. मालिका तुर्तास निरोप घेत नसल्याने अनेक ट्विस्ट या मालिकेत पाहायला मिळणार आहे हे मात्र नक्की …

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here