Home Actors विनायक माळी नक्की आहे तरी कोण? कसा झाला इतका फेमस जाणून घेऊयात

विनायक माळी नक्की आहे तरी कोण? कसा झाला इतका फेमस जाणून घेऊयात

23234
0
vinayak mali photos
vinayak mali photos

सध्या सोशिअल मिडीयाचा जमाना आहे अनेक तरुण तरुणी विरंगुळा म्हणून फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबवर आपला वेळ घालवतात. कोणी ऑनलाईन मालिका पाहत, काही खवय्ये पाककले संदर्भातील व्हिडिओ पाहतात तर कोणी कॉमेडी व्हिडिओना प्राधान्य देतात. सध्या सोशिअल मीडियावर एका आगरी किंग ची हवा आहे त्याच नाव आहे विनायक माळी. आगरी कोळी भाषेतला एक वैतागलेला मराठी माणुस म्हणून आपल्या स्वतःवर जोक करून प्रेक्षकांची मने जिंकणारा विनायक माळी नक्की आहे तरी कोण? त्याच शिक्षण काय? तो आज इतका फेमस कसा काय झाला? अश्या अनेक प्रश्नाची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत….

vinayak mali dadus

रायगड मधील पनवेलमध्ये २२ सप्टेंबर १९९५ साली एका मिडलक्लास फॅमिलीमध्ये विनायक माळी ह्याचा जन्म झाला. विनायकने वडील कोर्टात सरकारी नोकरी करतात. नोकरीनिमित्त वडील सहकुटुंब ठाण्यात राहायला आले. विनायकचं संपूर्ण शिक्षण ठाण्यातच झालं त्याने एलएलबी केलं आहे. ठाणा कॉलेजमध्ये सेकंडइयरला असताना त्याने एक शॉर्ट फिल्म बनवली. त्यात त्याला चांगलं यश आलं आणि पुढे त्याने ह्यातच करियर करायचं ठरवलं. याआधीही त्याने ऍड एजन्सीमध्ये फ्री लँसिन्ग केलं आहे. त्यामुळे त्याला ह्यातच करियर कार्यात आणि व्हिडिओ एडिटिंग करण्यात खूप सोपं गेलं. व्हिडिओ बनवता बनावट तो विप्रो ह्या कंपनीत जॉब देखील करत होता पण जॉब चा टाइम सूट होत नसल्यामुळं त्यानं ती चांगल्या पगाराची नोकरी कारण सोडून दिल. सुरवातीला त्याने अनेक हिंदी व्हिडिओ केले पण त्यात त्याला खूप अपयश आलं. त्यामुळे त्याने ते हिंदी व्हिडिओ बनवणं सोडून आपल्या रांगड्या आगरी कोळी भाषेत व्हिडिओ बनवायला सुरवात केली. हे व्हिडिओ बनवताना त्याला त्याच्या मित्रांचे खूप सहकार्य लाभले.

vinayak mali in jwellery shop

सुरवातीला छोटे विडिओ बनवून त्याने ते उपलोड केले मग त्याचा आढावा घेत प्रेक्षकांना काय पाहायला आवडत हे शोधलं विनोद हा आधी स्वतःवर करता आला पाहिजे हे त्याने ओळखलं आणि पुन्हा नव्याने व्हिडिओ बनवायला सुरवात केली. “आम्ही आगरी कोळी पोरं” हा त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. ह्या विडिओ पाठोपाठ “दादूस गेला जिमला” “माझी बायको” हे व्हिडिओ तुफान गाजले. त्यानंतर त्याने केलेले “दादूस गेला पत्रिका वाटायला” “दादूस गेला कर्नाळ्याला” “दादूस गेला हळदीला” अशे एका पाठोपाठ एक व्हिडिओ व्हायरल झाले. हे व्हिडिओ व्हायरल होण्यामागे देखील एक कारण आहे ते म्हणजे विनायक हे व्हिडिओ रिअल स्पॉट वर जाऊन करतो शिवाय त्यात तो तेथील लोकांना सहभागी करून घेतो ह्यामुळे त्याचा फॅन फोल्लोवर वाढायला खूप मदत झाली. त्यामुळे त्याचे व्हिडिओ हे रियलिस्टिक वाटतात. एक वैतागलेला माणूसच नाही तर त्याने साकारलेला शेठ माणूस देखील लोकांना फारच आवडला. त्याची भाषा त्याची स्टाईल त्याच बरोबर तो व्हिडिओ बनवतो ती ठिकाणे सर्व काही जुळवून घेतो हेच त्याच्या व्हिडिओ व्हायरल होण्यामागचं रहस्य आहे कारण लोकांना रिऍलिटी चा फील येतो उगाचच ओढून ताडून केलेली कॉमेडी बघण्यापेक्षा प्रेक्षकांना असे व्हिडिओ पाहण्यातच रस आहे हे ह्यातून दिसून येत. अनेक टीव्ही शोमध्ये त्याला बोलावलं जात. इतकाच काय तर मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी देखील त्याला पसंती दिली जाते. विनायक माळी ह्याला त्याच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here