झी मराठी वाहिनीवर सध्या तू चाल पुढं हि मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच आवडीची मालिका बनली आहे. मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्यांमुळे सुरवातीपासूनच हि मालिका पाहायला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. मालिकेत दीपा परब चौधरी, आदित्य वैद्य, वैष्णवी कल्याणकर, धनश्री काडगावकर, देवेंद्र दोडके या कलाकारांनी उत्तम अभिनय केलेला पाहायला मिळतो. हि मालिका एका गृहिणीवर आधारित आहे. परिवारावर आलेल्या संकटाना सामोरं जात पतीच्या खांद्याला खांदा लावून काम करायची जिद्द तिच्या मनात आहे. पण पतीचा बिजनेस बुडतो आणि ती स्वतः व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेत कोलमडलेल्या घराला आधार देण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळते. ह्या मालिकेत अंकुश चौधरी यांची पत्नी दीपा परब चौधरी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

तू चाल पुढं या मालिकेत बाबांचं पात्र देखील विशेष भाव खाऊन जात. मुलाच्या कोलमडलेल्या संसाराला उभारी देण्यासाठी आपल्या गावची जमीन आणि आपल्याकडचा सगळं पैसा पणाला लावून ते मुलाची साथ देतात पण त्यातही मुलगा अपयशी ठरतो. पण आता सुनेने काम करण्यासाठी पुढाकार घेतला हे पाहून त्यांनी तिची पाठ राखण करत तिला उभे जाण्यासाठी उमेद दिलेली पाहायला मिळते. बाबांचं पात्र अभिनेते देवेंद्र दोडके यांनी साकारलं आहे. देवेंद्र दोडके याना तुम्ही याआधी देखील अनेक मालिकांत पाहिलं असेल. झी वाहिनीच्या माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील देखील त्यांनी बाबांची भूमिका उत्तमरीत्या निभावली होती. त्यांच्या या अभिनयामुळेच त्यांना हि मालिका मिळाली असावी असा अंदाज येतो. मालिकाच नाही तर अनेक चित्रपटांत अभिनेते देवेंद्र दोडके यांनी विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. अलका कुबल यांच्या “धनगरवाडा” ह्या चित्रपटात देखील त्यांनी महत्वाची भूमिका साकारली होती. “आम्ही कारभारणी”, “गजब हेराफेरी”,”लाल चुडा” ,”घाम”, “जय साई राम” अश्या अनेक चित्रपटात त्यांनी कधी पोलीस तर कधी सावकाराच्या भूमिका साकारल्या आहेत. “तानी” या चित्रपटात देखील त्यांनी उत्तम अभिनय केलेला पाहायला मिळाला.

अनेकांना हे माहित नसेल कि अभिनेते देवेंद्र दोडके यांची पत्नी देखील अभिनेत्री आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून त्या अभिनयापासून दूर गेल्या असल्याचं दिसून येत. “शिर्डी साई” या चित्रपटात साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांनी साई ची भूमिका साकारली होती. तर देवेंद्र दोडके यांनी श्यामची भूमिका साकारली होती. याच चित्रपटात देवेंद्र दोडके यांच्या पत्नी “दीपाली दोडके”ह्यांनी देखील भूमिका साकारली होती. शिर्डी साई चित्रपटात अभिनेत्री दीपाली दोडके यांनी राधाबाई देशमुख हि भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर देखील त्यांनी काही चित्रपटात देवीच्या भूमिका साकारल्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून त्या अभिनयापासून दूर गेलेल्या पाहायला मिळतात. असो चित्रपट आणि मालिकेतील सर्वांच्या आवडीचे अभिनेते देवेंद्र दोडके याना तू चाल पुढं या मालिकेतील बाबांच्या भूमिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…