स्वराज्यरक्षक संभाजी मालिकाफेम “विजय आंदळकर” आणि अभिनेत्री “रुपाली झनकर” यांचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. त्यामुळे विजय आंदळकर लवकरच दुसऱ्यांदा बोहल्यावर चढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अगोदर २०१७ साली अभिनेत्री “पूजा पुरंदरे” हिच्यासोबत विजय आंदळकर याने मोठ्या थाटात लग्न केले होते. यावेळी मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटीनी हजेरी लावली होती. पूजा पुरंदरे ही विजयची पहिली पत्नी आहे. पूजा सध्या सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून महत्वाची भूमिका साकारत आहे.

विजय आंदळकर आणि रुपाली झनकर यांनी “लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू” या झी मराठीवरील मालिकेतून एकत्रित काम केले होते. विजयने मदनची भूमिका तर रुपालीने या मालिकेतून मदनची पत्नी अर्थात काजलची भूमिका साकारली होती. या मालिकेचे शूटिंग नाशिक येथे पार पडले होते त्यामुळे मालिकेचे सर्वच कलाकार त्याच ठिकाणी स्थायिक झाले होते. या मालिकेत एकत्रित काम करत असतानाच रुपाली आणि विजय या दोघांमध्ये जवळीक वाढत गेली आणि आता या दोघांनी लवकरच लग्नही करण्याचा निर्णय घेतला आहे. काल या दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला असून त्याचे फोटो रुपालीने आपल्या इन्स्टाग्रामवरुन आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत तर साधारण दोन दिवसांपूर्वीच तिने ‘नवरी नटली काळूबाई सुपारी फुटली’ असे कॅप्शन देऊन लग्न ठरल्याची माहिती दिली होती मात्र ती कोणासोबत लग्न करणार याबाबत गुप्तता बाळगली होती. रुपाली झनकर आणि विजय आंदळकर या दोघांनाही साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा…