Home Entertainment सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील ह्या कलाकाराचा मुलगा करतो हे काम

सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील ह्या कलाकाराचा मुलगा करतो हे काम

3775
0
umesh damle son manas damle
umesh damle son manas damle

कलर्स मराठी वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील लतीकाचे वडील म्हणजेच बापुची भूमिका साकारली आहे अभिनेते “उमेश दामले” यांनी. उमेश दामले यांनी मुळशी पॅटर्न, मोगरा फुलला, जावई विकत घेणे आहे, नकळत सारे घडले, आजोबा वयात आले, रणांगण, मितवा, एक झुंज वाऱ्याशी अशा नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतून बापूच्या भूमिकेने त्यांना अधिक लोकप्रियता मिळवून दिली. उमेश दामले यांचे कुटुंब पुण्यात इडली सेंटर चालवतात तिथे मिळणाऱ्या इडली सांबरची तारीफ अनेक खवय्यांनी केली आहे अगदी सुंदरा मनामध्ये भरली मालिकेची मुख्य अभिनेत्री अक्षया नाईक हिनेही या पदार्थांची चव चाखली आहे आणि हे पदार्थ अप्रतिम चवीचे आहेत अशी प्रतिक्रिया तिने दिली.

umesh damle with wife and son
umesh damle with wife and son

अभिनेते उमेश दामले यांचा मुलगा मानस दामले पुण्यात हे “दामले इडली सेंटर ” चालवत आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत भरतनाट्य मंदिराजवळ ह्या सेंटरची स्थापना त्यांनी केली आहे. मानसने पाककला शास्त्र विषयाची पदवी मिळवली होती. परंतु यात यश मिळेल की नाही याची शाश्वती त्याला नव्हती त्यामुळे पुढे जाऊन त्याने आयटी क्षेत्रात नोकरी करण्याचे ठरवले. गलेलठ्ठ पगार मिळवत असताना या निकरीतून मानसिक समाधान मात्र त्याला मिळत नव्हते. मग पुन्हा एकदा पाककलेकडे वळण्याचे धाडस केले. स्वतःचा व्यवसाय करून यातच आपले करिअर करायचे असे ठरवले असताना सुरुवातीला व्यवसाय करण्याला सगळीकडून विरोध होऊ लागला. मात्र हा विरोध डावलून व्यवसाय क्षेत्रात उतरण्याचे धाडस केले. प्रथमतः पदार्थांची चव आणि ग्राहकांची तृप्ती यावर भर देऊन आपले पदार्थ स्वादिष्ट कसे बनतील याचा अभ्यास केला. त्याने बनवलेली चटणी आणि विशिष्ट पद्धतीने बनवलेले सांबर खवय्यांना आकर्षित करणारे ठरले. आता तर सोयीनुसार त्याचे हे पदार्थ घरी बसून तुम्हाला मागवता येणे शक्य झाले आहे. त्याचा हा व्यवसाय आता दिवसेंदिवस वृद्धिंगत होताना दिसत आहे. या व्यवसायात मानसला अजून यश मिळो हीच सदिच्छा आणि पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here