Home Entertainment सैराट चित्रपटातली आनी साकारणारी अभिनेत्री पहा सध्या काय करते…पाहून आश्चर्य वाटेल

सैराट चित्रपटातली आनी साकारणारी अभिनेत्री पहा सध्या काय करते…पाहून आश्चर्य वाटेल

1979
0
sairat fame aani anuja mulye
sairat fame aani anuja mulye

२०१६ साली नागराज मंजुळे यांचा सैराट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता नुकतेच या चित्रपटाला प्रदर्शित होऊन ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या तर सल्या, प्रदीप, प्रिन्स ह्या भूमिका साकारणारे कलाकार कुठल्या न कुठल्या चित्रपटाच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांसमोर येत राहिले आहेत. त्यामुळे चित्रपटातील बहुतेक कलाकार या चंदेरी दुनियेत तग धरून असलेली दिसतात. मात्र चित्रपटातील एक चेहरा कला क्षेत्रापासून खूप दूर असलेला पाहायला मिळतो आहे. चित्रपटातली आर्चीची मैत्रीण म्हणजेच आनी गेल्या ५ वर्षांपासून मात्र कुठल्याच चित्रपटात झळकलेली नाही त्यामुळे आनीचा चेहरा स्मरणात जरी असला तरी ती सध्या काय करते? आणि ती कशी दिसते? याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण होताना दिसते. चला तर मग जाणून घेऊयात ही आनी सध्या कुठे आहे आणि ती काय करतेय…

चित्रपटातली आनी साकारली होती अभिनेत्री “अनुजा मुळे” हिने. अनुजा पुण्यात शिकत असताना एकांकिका सर्धेमध्ये सहभागी व्हायची “चिठ्ठी” या एकांकिकेतील तिच्या अभिनयाला उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले होते. इथेच नागराज मंजुळे यांनी सैराट चित्रपटात आनीच्या भूमिकेसाठी तिच्या नावावर शिक्कामोर्तब केला. मात्र सैराट चित्रपटाच्या भरघोस यशानंतरही ही आनी कुठल्या प्रोजेक्टमधून कधीच समोर आली नाही. नुकतेच तिने ‘Ask Me Now’ या सोशल मीडियावरील फिचर वापरून आपल्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यात एका चाहत्याने ‘ सध्या तू काय करतेस?’ हा प्रश्न विचारला… यावर अनुजाने आपला वकीलीच्या कपड्यातील एक फोटो शेअर करून ‘वकिली’ असे उत्तर देऊन सगळ्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. यावरून अनुजाने या चंदेरी दुनियेचा अधिक मोह न धरता आपले शिक्षण पूर्ण करण्यावर भर दिलेला पाहायला मिळतो आहे. सैराट मधली आनीची भूमिका छोटीशी जरी असली तरी ती प्रेक्षकांच्या विशेष स्मरणात राहिली होती आणि आहे.. आज इतकी वर्षे होऊनही आर्ची आणि परशा इतकी ती चर्चेत नसली तरी ती सध्या काय करत असावी इतपत तिची आठवण हा प्रेक्षकवर्ग नक्कीच काढत राहतील एवढा विश्वास वाटतो….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here