Home Entertainment ‘पहिली बेटी धनाची पेटी’ RRR फेम रामचरण झालायं तब्बल अकरा वर्षानंतर बाप…...

‘पहिली बेटी धनाची पेटी’ RRR फेम रामचरण झालायं तब्बल अकरा वर्षानंतर बाप… पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज

480
0
ram charan wife photo
ram charan wife photo

दाक्षिणात्य चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेता राम चरण हा त्याच्या स्टायलिस्ट आणि ॲक्शनबाज चित्रपटांसाठी कायम चर्चेत राहिला आहे. त्याच्या डॅशिंग अभिनयाने तो चाहत्यांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतो. अशातचं रामचरणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करून त्याने सर्व चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. रामचरण आणि त्याची पत्नी उपासना या दोघांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. लग्नाच्या तब्बल अकरा वर्षानंतर हे दोघं आई बाबा झाले आहेत. हैदराबादमधील अपोलो हॉस्पिटल येथे मेडिकल बुलेटीनने या दोघांना मुलगी झाल्याचं जाहीर केलं असून, रामचरणने त्या हॉस्पिटलच्या कागदाचा एक फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये त्याला मुलगी झाली असून, तो बाप झाल्याचं नमूद केलं आहे. 20 जून 2023 रोजी रामचरणला पितृत्व प्राप्त झालं असून, तो फारच आनंदी आहे. 2012 च्या जून महिन्यात रामचरण आणि त्याची पत्नी उपासना यांचा विवाह झाला.

ram charan family photo
ram charan family photo

सोबतच गेल्यावर्षी रामचरणने एक खास पोस्ट शेअर करत चहात्यांना गोड बातमी दिली होती ती म्हणजे,” आम्ही दोघं बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झालो आहोत तुम्हाला ही बातमी कळवताना आम्हाला फार आनंद होत आहे. तुमचं प्रेम सदैव असच राहू द्या”. असं कॅप्शन लिहीत रामचरणने एक पोस्ट शेअर केली होती. रामचरणला मुलगी झाल्याचं जाहीर झालं असून, चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. त्याच्या छोट्या प्रिन्सेसची झलक पाहण्यासाठी अनेक चाहते मंडळी उत्सुक आहेत. रामचरणने सिनेसृष्टीला आत्तापर्यंत भरपूर चित्रपट दिले आहे. त्याने RRR या चित्रपटामधुन प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असून, या चित्रपटासाठी त्याला अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर राम चरणचा ‘द इंडिया हाऊस’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. दरम्यान रामचरण त्याच्या लेकीबाबत कोणती पोस्ट शेअर करेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here