Home Entertainment माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्रीची लगीनघाई लग्नाची खरेदी झाली सुरू

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिनेत्रीची लगीनघाई लग्नाची खरेदी झाली सुरू

3001
0
actress rasika sunil
actress rasika sunil

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनयाच्या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले. मधल्या काळात तिच्या नसण्याने मालिका बेरंग झाली होती मात्र आपले शिक्षण पूर्ण करताच ती पुन्हा एकदा मालिकेतून सक्रिय झाली. शनयाची भूमिका साकारली होती अभिनेत्री “रसिका सुनील” हिने. रसिका एक उत्कृष्ट अभिनेत्री सोबत उत्तम गायिका देखील आहे. पोस्टर गर्ल, बसस्टॉप, गर्लफ्रेंड या चित्रपटातून ती मोठ्या पडद्यावर झळकली आहे. माझ्या नवऱ्याची बायको मालिकेने रसिकाला अमाप प्रसिद्धी मिळाली प्रथमच विरोधी भूमिका साकारणारी नायिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली होती. रसिका सुनील आता लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे समोर आले आहे.

actress rasika sunil
actress rasika sunil

तिच्या लग्नाची खास तयारी देखील तिने सुरू केली आहे. ठाण्यात असलेल्या शिवशाही पैठणी या प्रसिद्ध दुकानात जाऊन तिने नुकतीच लग्नाच्या बसत्याची खरेदी केली आहे. त्यामुळे रसिका सुनील लवकरच लग्नाची तारीख देखील जाहीर करणार असल्याचे समोर आले आहे. डान्सर, कोरिओग्राफर आणि इंजिनिअर असलेल्या आदित्य बिलागी ह्याच्यासोबत ती लग्न करणार आहे. आदित्य हा यूएसए मध्ये आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेला होता. काही महिन्यांपूर्वी तो ठाण्याला असलेल्या आपल्या घरी परतला आहे. रसिका आणि आदित्य यांची ओळख यूएसए मध्येच झाली होती आणि तिथेच आदित्यने रसिकाला प्रपोज देखील केले होते. रसिका सुद्धा आदित्य सोबत मायदेशी परतली असून लवकरच ते लग्न करत असल्याचे जाहीर करतील . मात्र रसिका आदित्य सोबत थाटामाटात लग्न करणार की मोजक्याच मित्रमंडळीसमवेत हे अजून स्पष्ट झालेले नाही. याबाबत अधिक माहिती लवकरच समोर येईल तुर्तास रसिकाच्या लग्नाची लगबग आता सुरू झाल्याने त्यांचे हे लग्न काही दिवसातच होणार असल्याचे उघड झाले आहे. रसिकांच्या चाहत्यांसाठी तिचे लग्न ही आता त्यांच्यासाठी मोठी आनंदाची बाब ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here