Home Entertainment या कारणामुळे सलमान खान लक्ष्याला सेटवर घाबरून असायचा इतकंच नाही तर त्याच्या...

या कारणामुळे सलमान खान लक्ष्याला सेटवर घाबरून असायचा इतकंच नाही तर त्याच्या समोर यायचं धाडस देखील करत नव्हता

9147
0
laksmikant berde and salman photo
laksmikant berde and salman photo

आज २६ ऑक्टोबर आपल्या आवडत्या मराठी कलाकाराचा म्हणजेच लक्ष्याचा वाढदिवस २६ ऑक्टोबर १९५४ साली लक्ष्याचा रत्नागिरीत जन्म झाला. लहानपणाची गरिबीत दिवस काढलेला लक्ष्मीकांतला मोठं झाल्यावर खूप पैसे मिळावे म्हणून कंडक्टर व्हायचं होत.पण नाटकात त्याला पडदा ओढण्यापासून ते नाटकाच्या सुरवातीला आणि शेवटाला घंटा वाजवण्याचे काम देखील मिळाले. पुढे आपल्यातील कलाकार त्याने त्याच कलाकारांसमोर सादर केला आणि लक्ष्याची गाडी हळूहळू अभिनयाच्या पटरीवर धावू लागली. मराठीतला सर्वात मोठा कलाकार म्हणून त्याने किताब देखील पटकावला. हळूहळू मराठीसोबत तो हिंदी चित्रपटात देखील झळकायला लागला.

lakshmikant berde and salman khan
lakshmikant berde and salman khan

“मैने प्यार किया” हा सलमानचा प्रमुख भूमिका असलेला चित्रपट १९८९ साली आला ह्या चित्रपटात लक्ष्मीकांत सोबत अनेक मराठी कलाकार देखील झळकले. परंतु या चित्रपटाअगोदर बिवी हो तो ऐसी चित्रपटातून त्याने सहनायक साकारलेला पाहायला मिळाला होता. खरं तर मैने प्यार किया चित्रपटातील प्रेमच्या भूमिकेसाठी ‘सलमान खान खुपच लहान दिसतो…तो या भूमिकेसाठी योग्य नाही’ असे मत दिग्दर्शक सूरज बडजात्यांचे होते परंतु कालांतराने त्यांनी आपले हे मत बदलवले आणि ही भूमिका सलमान खानच करणार यावर शिक्कामोर्तब केला. ह्या चित्रपटाच्या आठवणी सांगताना एका मुलाखतीत लक्ष्मीकांत बेर्डे म्हणाले होते ” मी मराठीचा नायक असल्याने आणि माझं मराठी सृष्टीत चांगलं नाव असल्याने हिंदी कलाकार थोडंस घाबरून असतात त्यामुळे मैने प्यार किया चित्रपटावेळी कोणीतरी सलमानला सांगितलं होतं की लक्ष्मीकांतपासून सावध रहा…तो आयत्या वेळेला ऍडिशन करतो. सुरुवातीला तो माझ्याशी बोलायचाच नाही मग मीच त्याला होऊन विचारल की तू असं का करतोयस? जोपर्यंत आपले ट्युनिंग होत नाही तोपर्यंत आपले सिन चांगले होणार नाहीत…तर मराठीच होती ती माझी फॅनच असल्याने आमचं चांगलं जुळून गेलं होतं परंतु सलमानसोबत जुळून यायला आम्हाला थोडा वेळ लागला. एका सीनमध्ये दोघांना एकत्रित काम करायचं होतं

salman khan and laksmikant berde
salman khan and laksmikant berde

त्यावेळी डायरेक्टरला मी स्वतः जाऊन सांगितलं की हा आमचा दोघांचा सिन आहे मला अव्हॉइड कर नाहीतर सगळी लोकं माझ्याकडे बघत बसतील त्यावेळी सलमानने त्याची चूक मान्य करून एकत्र सिन देण्यास सहकार्य दाखवले. मराठी सृष्टीत आम्ही असंच करतो आम्ही सर्व कलाकार नेहमीच एकत्र राहतो… अशोक सराफ यांच्यासोबत मी अनेकदा काम केलं एक धाकटा भाऊ म्हणून मला खूपदा त्यांनी सांभाळून घेतलं आहे. त्यांनी कधीच आपलं सिनिअर असणं दाखवून दिलं नाही. त्यामुळं लोकं म्हणतात की ही दृष्ट लागण्यासारखी जोडी आहे. म्हणूनच मी नेहमी हिंदी कलाकारांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो .” लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दिलेल्या या मुलाखतीतून आणखी बरेचसे किस्से ऐकवले आहेत. आईच्या बाबतीत मात्र तो हळवा होता. आई बद्दलच्या गोष्टी सांगताना त्याच्या डोळ्यांत नेहमी पाणी साचलेलं दिसत. एकदा जितेंद्र यांची स्टाईल असलेली टाईट पॅन्ट घातली होती, त्या टाईट पॅन्ट मुळे खरं तर धड उठताही येत नव्हते आणि बसताही येत नव्हते.. शेवटी ती पॅन्ट फाटली म्हणून त्यांना आईच्या हातचा मार खावा लागला होता हा किस्सा देखील त्यांनी त्या मुलाखतीत आपल्या चाहत्यांना सुनावलं होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here