सध्या महा मा’रीच्या काळात अनेकांच्या हाताला काम नाहीये तर कित्येकांच्या दोन वेळच्या जेवणाची आबाळ होताना दिसत आहे. अशात अनेक मराठी कलाकार, सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे. नुकतेच अभिनेता स्वप्नील जोशीने सामाजिक कार्यकर्ते मॉरिस नोरोनहा यांच्या मदतीने सिने सृष्टीतील १०० हून अधिक स्पॉटबॉयज ना किराणा वाटप करून मदतीचा हात पुढे केला आहे. तर अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने देखील एक अनोखा उपक्रम राबवून गरजूंना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

खरं तर आपली आवडती गोष्ट विकून ती हा अनोखा उपक्रम राबवित असल्याचे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. प्रार्थना बेहरे गेल्या बऱ्याच दिवसांपासून शूटिंग बंद असल्याने घरीच आहे. परंतु घरी असलेली प्रार्थना आपल्या रिकाम्या वेळेत पेंटिंगची आवड जोपासत आहे. काही दिवसांपासून तिने बनवलेली पेंटिंग तिच्या इन्स्टाग्रामवरून तिने शेअर केली आहेत. या पेंटिंगची ती विक्री करून त्यातून मिळणारे पैसे ती समाजकार्यासाठी देणार आहे. मिळणाऱ्या रकमेतून गरजू लोकांना मदत करायची संकल्पना तिला तिच्या मैत्रिणीने सुचवली आहे. स्वतःच art विकायला कोणालाच आवडत नाही पण मी हे पेंटिंग पैसे कमावण्यासाठी विकत नसून ह्यामधून मिळणारी सर्व रक्कम समाजकार्यासाठी वापरणार आहे….हे पेंटिंग विकायला आहेत म्हणून घेऊ नका, तर ते पैसे तुम्ही समाज कार्यासाठी दान करत आहेत अशी भावना ठेवा आणि त्याबद्दल माझ्याकडून हे पेंटिंग रिटर्न गिफ्ट आहेत असे समजा….असे म्हणून प्रार्थना ने तिच्या चाहत्यांना तिचे पेंटिंग खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. ह्या उपक्रमातून मिळणारा आनंद समाधान महत्वाचे आहेत. तुम्ही सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हावे अशी प्रार्थना तिने चाहत्यांना केली आहे….