चला हवा येऊ द्या या शोमच्या माध्यमातून भाऊ कदम मध्यवर्ती भूमिका बजावून प्रेक्षकांना खळखळून हसवतो. गेल्या कित्येक वर्षांपासून तो या मंचाचा महत्वाचा भाग बनला आहे. त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना चित्रपटातूनही दिसली. भाऊ कदमला मृण्मयी, संचिता, समृद्धी या तिन मुली आणि आराध्य हा एक मुलगा आहे. त्यापैकी मृण्मयी कदम ही त्यांची थोरली मुलगी व्यवसाय क्षेत्रात आपले करिअर घडवू पाहत आहे. मृण्मयी सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे शिवाय तिचे युट्युब चॅनल देखील आहे. तिच्या या व्हिडिओजना चाहत्यांकडून नेहमीच पसंती मिळताना दिसते.

तिच्या नावाने असलेल्या या युट्युब चॅनलला ५ हजार ७०० हून अधिक लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. मृण्मयीने एन जी बेडेकर ऑफ कॉमर्स कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे याशिवाय नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी मधून ती शिक्षण घेत आहे. त्यामुळे निश्चितच याच क्षेत्रात तिनं करिअर करायचं ठरवलं आहे. “TA रुंध्या” हा नावाने मृण्मयीने स्वतःचा ब्रँड सुरू केला आहे. ज्यात विविध प्रकारचे हेअर बो तुम्हाला पाहायला मिळतील. सध्या तिच्या ह्या हेअर बो ला चांगल्या प्रकारे मागणी देखील आहे. मृण्मयी आपल्या बहीण भावंडासोबत वेगवेगळे व्हिडीओ बनवत असते. ह्या व्हीडीओजना चांगले व्हीव्हज देखील मिळतात. मृण्मयीला आपल्या वडीलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात देखील काम करण्याची आवड आहे. परंतु आधी तिने आपले शिक्षण पूर्ण करण्याला प्राधान्य दिले आहे. आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर अभिनयाची संधी तिच्यासाठी आली तर यात ती नक्की काम करेल असं ती म्हणते. भविष्यात अशी संधी मिळाल्यास मृण्मयी अभिनय क्षेत्रात नक्की चमकदार कामगिरी करेल अशी आशा आहे. तूर्तास मृण्मयीला तिच्या व्यवसायानिमित्त तिला खूप खूप शुभेच्छा…