बिगबॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये आजवर सर्वोत्तम खेळाडू म्हणून अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिच्याकडे पाहिलं जात होत. अनेकांना तर तीच ह्या शोची विजेती देखील वाटत होती. पण बिगबॉसच्या घरात खेळ खेळात असताना तिच्या हाताला दुखापत झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तिला सक्तीची विश्रांती खूपच गरजेची होती. आता बिगबॉसच्या घरात राहून खेळ खेळणे तिला अवघड जाणार होते म्हणून तिला बिगबॉसच्या घरातून बाहेर पडावे लागले. आपले असंख्य चाहते आपल्याला पुन्हा खेळण्यासाठी नवी उमेद देताहेत हे पाहून ती देखील बिगबॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री करण्यासाठी तितकीच आतुर असल्याचं ती म्हणते. नुकतीच आपल्या चाहत्यांना लाईव्ह भेटण्यासाठी तिने सोशल मीडियाचा आधार घेतला. अनेक चाहत्यांनी हवेली तिच्याशी संपर्क देखील साधला तिच्या तब्बेतीची विचारपूस देखील केली.

ह्यावेळी अनेक प्रश्नांना तिने उत्तरे देत सपोर्ट करणाऱ्या चाहत्यांचे आभार देखील मानले. अनेकांनी तिला तुझं खरोखरच लग्न झालं नाही का असाही प्रश्न विचारला त्यावर तिने खरंच माझं लग्न झालं नसून मी अजूनही सिंगल आहे असं हसत म्हणाली. बिगबॉसच्या ४ थ्या सिजनमध्ये जर मला पुन्हा जाण्याची संधी मिळाली तर मी नक्की जाईल आणि आधी ज्या उत्साहाने सगळे खेळ खेळले त्याच उत्साहात पुढेही खेळात राहील असं ती म्हणते. पुढे काय प्लॅन आहे असा प्रश्न विचारताच तिने एक घोषणा देखील केली. पुढे मी निर्मिती क्षेत्रात उतरणार असल्याचा ठाम निर्णय घेतला आहे. पण बिगबॉसच्या ह्याच सिजनमध्ये नाही तर पुढे देखील जर कधी मला बिगबॉसच्या घरात प्रवेश मिळाला तर मी नक्की त्या संधीच सोनं करेल, पण हा जर तरच प्रश्न आहे. पण निर्मिती क्षेत्रात उतरून काहीतरी करून दाखवायचंय आणि त्याचा निर्णय मनाशी घट्ट बांधला आहे. या पुढे वेळोवेळी मी सोशल मीडियाच्या आधारे आपल्या चाहत्यांशी जोडलेली असेल त्यांचे प्रश्न त्यांच्या मनातील शंका ह्यांना मी नक्कीच उत्तर देणार असं हि म्हणाली. बिगबॉसच्या सिजनमुळे अभिनेत्री तेजस्वीनि लोणारी हिला अनेक वर्षानंतर पुन्हा पसंती मिळालेली पाहायला मिळाली त्यामुळे बिगबॉसच घर तिच्या पुढील आयुष्यासाठी देखील टर्निंग पॉईंट ठरणार हेही तितकंच खरं.