बिगबॉस मराठी सीजन ३ मध्ये अविष्कार दारव्हेकर घरात ज्याप्रकारे वावरत होता त्यावरून प्रेक्षक त्याची बाजू घेताना पाहायला मिळाले. महामारीच्या काळात देखील त्याने अनेक गरजू लोकांना कमी खर्चात जेवण दिले स्वतःच हॉटेल त्याने ना नफा ना तोटा ह्या तत्वावर चालवलं ह्यामुळे गरजू लोकांना खूपच फायदा झाला. हे सर्व पाहता बिगबॉसच्या घरातून बाहेर पडताना लोकांनी त्याला भरभरून दाद दिली. काही महिन्यांपूर्वी आविष्कार दारव्हेकर विवाहबंधनात अडकला आहे हे त्याच तिसरं लग्न आहे हे क्वचितच काही लोकांना माहित असेल. मराठी तसेच हिंदी मालिका अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्यासोबत तो विवाहबद्ध झाला मात्र शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी स्नेहाने अविष्कारला घटस्फोट दिला. बिग बॉसच्या घरात हे दोघे पुन्हा एकत्र आले मात्र या दोघांनी एकमेकांपासून दूर राहणेच पसंत केले. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अविष्कार पुन्हा विवाहबद्ध झाला त्यामुळे तो चर्चेत येऊ लागला.

ह्या गोजिरवाण्या घरात, अधुरी एक कहाणी, तू माझा सांगाती या मालिकांमधून अविष्कार दारव्हेकर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आविष्काराचे वडील देखील कलाक्षेत्राशी निगडित असल्याने ह्या क्षेत्रात येण्यासाठी त्याला फार काही मेहनत घावी लागली नाही. अभिनेत्री स्नेहा वाघ हिच्यासोबत घटस्फोट झाल्यांनतर आविष्काराने स्मिता सावंत हिच्याशी लग्नगाठ बांधली. अगदी बिगबॉसच्या घरात येण्याआधीच त्याने लग्न केलं होत. त्याला एक मुलगा देखील आहे. पण हि बाब त्याने बिगबॉसच्या घरात लपवलेली पाहायला मिळाली. मी त्यानांतर एकटा जीवन जगतोय असच तो नेहमी सांगत आला. बिगबॉसच्या घरातून बहिर आल्यानंतर त्याने काही महिन्यांपूर्वी लग्न केलं. पण हे त्याच तिसरं लग्न आहे हे देखील त्याने अनेकांपासून लपवलं. अविष्कारची दुसरी पत्नी स्मिता सावंत हिने या लग्नाला विरोध दर्शवला आहे. अविष्कारचे तिसरे लग्न हे बेकायदेशीर असल्याचा दावा स्मिता यांनी केला आहे. याबाबत स्मिता स्पष्टपणे म्हणतात की, ‘लग्नानंतर दारू पिऊन रोज मारायचा रात्रभर घराबाहेर बसवून ठेवायचा घाणेरडे आरोप करायचा माझ्या प्रेगनान्सी मधेही खूप मारलं रात्रभर जमिनीवर बसवून ठेवायचा माझ्या 7 व्या महिन्या मधे घरात संपूर्ण तेल पाणी ओतून ठेवलं डाळ तांदूळ फेकून दिले आणि मला ते सगळं साफ करायला लावलं त्यात मी पडले तरी त्याने बघितलं पण नाही. बनवलेले जेवण फेकून द्यायचा आणि रात्री २-३ वाजता परत बनवायला लावायचा हातात जे मिळेल त्याने मारायचा चालत्या कार मधून ढकलून देत होता. त्याच्या न होणाऱ्या कामाचं, अपयाशाच खापर माझ्या माथी मारलं त्याच्या मते मी त्याला काम मिळवून द्यायला हवं होत. मी डायरेक्टर , प्रोडूसर शी बोलायला हवं होत. अशा बऱ्याच घटना आहेत की त्याने मला मानसिक, शारीरिक त्रास दिला आहे. याच्या बाकी फॅमिली ला सुद्धा माहीत होत की यांनी असे लग्न केलं आहे. पण तरीही कोणी मला सांगितलं नाही की कळू दिलं नाही. यांच्या स्वतःच्या बहिणी सोबत असे झालं असतं तरी हे असेच शंडा सारखे गप्प राहिले असते का? स्वतःला उच्च शिक्षित, सुसंस्कृत म्हणवणारी ही दारव्हेकर फॅमिली अतिशय खालच्या पातळीची, नीच निघाली. याच्या वडिलांनीही हेच केलं. लग्नाची बायको असताना दुसरी बाई आणून ठेवली दुसरं घर केलं याच्या आई ने तरीही संसार केला. ज्या बाई सोबत हे घडलं आहे ती बाई स्वतःच्या सूने सोबत, जिच्या पदरात एवढा लहान मुलगा आहे तिच्या सोबत हे कसे काय होऊ देऊ शकते. तीच स्वतःच्या मुलाचं असे बेकायदेशीर लग्न कसे काय लावून देऊ शकते. किती असवेंदनशिल आहे हे स्त्री जातीला कालिंबा आहे ही बाई..’

स्मिता सावंत आविष्काराची दुसरी पत्नी म्हणते कि तो सतत हेच सांगत राहिला की माझ्या कामाचं झालं की मी येईन पण दुसरीकडे तर त्याने या मुलीशी अनैतिक नात संबंध ठेवले आणि त्यानंतर गुपचूप लग्न केलं त्याने बिग बॉस मधेही माझा आणि आमच्या मुलाचा कुठेही उल्लेख केला नाही. माझा वा माझ्या मुलाचा कोणताही खर्च हा देत नाही. आमच्या हक्काचे पैसे हा त्या मुलीवर उडवतो आहे. कायदेशीर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून लिव्हिंग रेलेशनशिप च प्रमाणपत्र काडल आहे.माझे आई वडील अतिशय साधी, सर्व सामान्य माणसं आहेत. मला कोणी भाऊ बहीण नाही कोणाचाही सपोर्ट नाही त्याचाच फायदा या लोकांनी घेतला आणि आम्हाला फसवल मला तो हेच सांगतो की मी 2 ला 5 लग्न केली तरी तू माझं काहीच बिगडवू शकत नाहीस कोणी माझ्या अंगाला हात पण लावू शकत नाही मारायचा तर लांब राहील त्याने त्याच्या पहिल्या लग्ना बद्दल ही मला खोटच सांगितलं होत.” ह्या सर्व घटनेवर अजूनही आविष्काराने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली समोर आलं नाही त्याने ह्या विषयावर मौन बाळगणंच पसंत केल्याचं दिसून येतंय. पण ह्या सर्व घटना लक्षात घेता बिगबॉसच्या घरात स्नेहा वाघाने त्याच्यापासून दूर राहून योग्य केलं असच दिसून येत.