Home Entertainment अगबाई अरेच्चा चित्रपटातील ‘ओ काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा’ हि मुलगी आता...

अगबाई अरेच्चा चित्रपटातील ‘ओ काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा’ हि मुलगी आता बनलीय अभिनेत्री

1371
0
actress sana kedar shinde
actress sana kedar shinde

मराठी चित्रपट ज्यात कॉमेडी सस्पेन्स आणि जादू असं काही असेल तर तो चित्रपट हिट होणार हे समीकरणच बनलं आहे. असाच एक चित्रपट २००४ साली अभिनेते आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी बनवला ह्या चित्रपटाला तुफान प्रसिद्धी मिळाली. ह्या चित्रपटाचं नाव होत “अगबाई अरेच्चा” केदार शिंदे ह्यांच्या हटके स्टोरीमुळे प्रेक्षकवर्गाने त्या चित्रपटाला अक्षरश डोक्यावर घेतलं. ह्या चित्रपटाची प्रसिद्धी पाहता ह्याचा पार्ट २ देखील काही वर्षांपूर्वीच बनला पण त्या चित्रपटाला हवी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. बायकांच्या मनातलं ऐकू येणारा नायक प्रेक्षकांच्या आवडीचा बनला ह्या चित्रपटातील गाणी देखील तितकीच सुपरहिट झालेली पाहायला मिळाली होती. उत्कंठावर्धक कथानक, सुपरहिट गाणी , सोनाली बेंद्रेचं आयटम सॉंग सगळं कस जुळून आलं होत.

agabai arecha film girl
agabai arecha film girl

ह्या चित्रपटात अभिनेत्रीतेजस्विनी पंडित हिने देखील खलनायिकीचे भूमिका साकारली होती. हि तेजस्विनीची पहिली भूमिका असल्याने तिलादेखील खूप मोठी स्टार्ट ह्या चित्रपटामुळे मिळाली. संजय नार्वेकर आणि प्रियांका यादव ह्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होत्या. प्रियांका यादव हिला देखील ह्याच चित्रपटामुळे अमाप प्रसिद्धी मिळाली. दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, रेखा कामत, सुहास जोशी, शुभांगी गोखले, विजय चव्हाण अश्या एक ना अनेक स्टार भरलेल्या ह्या चित्रपटात संगीत आणि अनुवाद देखील तितकाच जबरदस्त होता. या चित्रपटात एक चिमुरडी झळकली होती. या चिमुरडीने मनातल्या मनात नायकाला वेडा म्हणून हाक मारली होती. मात्र आपण मनात म्हटलेली गोष्ट या काकांना कशी काय समजली? असा प्रश्न तिला पडला होता. ‘ओ काका मीच म्हणाले तुम्हाला वेडा..’ असे म्हणून ही चिमुरडी नायकाला वाकड दाखवून हसताना दिसली. हा सीन इतका चांगल्या प्रकारे दाखवण्यात आला होता कि ह्याच्या अनेक क्लिप्स आजही सोशल मीडियावर लाखो हिट्स मिळवतात. पण हि चिमुरडी नक्की आहे तरी कोण? सध्या ती काय करते? असे अनेक सवाल परिक्षण नक्कीच पडले असतील. आज आम्ही तुम्हाला ह्या लहानग्या मुलीबद्दल बरच काही सांगणार आहोत.

kedar shinde daughter sana kedar shinde
kedar shinde daughter sana kedar shinde

२००४ साली चित्रपटात झळकलेली ही चिमुरडी दुसरी तिसरी कोणी नसून ह्याच चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांचीचआहे. केदार शिंदे यांच्या मुलीचं नाव “सना केदार शिंदे” असं आहे. आपल्या चित्रपटातील हि मुलगी कोण ह्याचा उलगडा खुद्द केदार शिंदे यांनी आपल्या सोशल मीडियावर करून दिली आहे. केदार शिंदे यांची मुलगी अभिनेत्री सना शिंदे एका बहुचर्चित चित्रपटातून नायिकेची भूमिका साकारणार आहे. २८ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिनेता अंकुश चौधरी शाहीर साबळेंची भूमिका साकारत आहे तर केदार शिंदे यांची लेक अभिनेत्री सना शिंदे शाहिरांची पत्नी भानुमती कृष्णराव साबळे यांची म्हणजेच आपल्या पणजीची भूमिका साकारत आहे. प्रमुख भूमिका साकारत पुन्हा केदार शिंदेच आपल्या मुलीला घेऊन येणार त्यामुळे हा चित्रपट तिच्यासाठी खूपच खास असणार हे नक्की. असो अभिनेत्री सना केदार शिंदे हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here