ह्या वर्षी मराठी सृष्टीतील अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकलेली पाहायला मिळाली. यात आता आणखी एक प्रसिद्ध अभिनेत्री लवकच लग्न करणार असल्याचे समोर आले आहे. ही अभिनेत्री आहे “रुचिता जाधव”. मराठी सृष्टीला लाभलेला ग्लॅमरस चेहरा म्हणूनही रुचिताला रक वेगळी ओळख मिळाली आहे. भरत जाधव सोबत काही चित्रपटात तिने काम केले आहे. लव लग्न लोचा, मनातल्या उन्हात, माणूस एक माती, भुताचा हनिमून या चित्रपटातून रुचिताने अभिनय साकारला आहे. मालिका, चित्रपट असा प्रवास चालू असताना काही दिवसांपूर्वी पूर्व युरोप आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने तिला गौरविण्यात आले होते.

Enigma या चित्रपटातील तिच्या अभिनयाला गोल्ड अवॉर्ड बेस्ट ऍक्टरेस या पुरस्काराने तिला नावाजले गेले आहे. रुचिता आता लवकरच लग्नबांधनात अडकणार आहे, येत्या ३ मे रोजी पाचगणी येथील एका खाजगी फार्महाऊसमध्ये काही मोजक्या नातेवाईक आणि मित्रमंडळी समवेत “आनंद माने ” यांच्यासोबत ती लग्न करणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रुचिताने तिच्या विवाहसोहळ्याबाबत ही माहिती दिली आहे. १ मे रोजी एंगेजमेंट आणि मेहंदी सोहळा पार पडणार असून २ तारखेला हळद आणि संगीत सोहळा पार पडणार असल्याचे तिने यावेळी सांगितले. रुचिता आणि आनंद यांची ओळख गेल्या वर्षी झाली होती. गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून ते एकमेकांच्या संपर्कात होते आणि मागच्याच आठवड्यात ९ एप्रिल रोजी आनंदने तिला प्रपोज देखील केले होते, असे ती यावेळी म्हणाली. लग्नाला मोजक्याच मंडळींना आमंत्रित करत असल्याने लग्नानंतर एक मोठी पार्टी आयोजित करण्यात येईल ज्यात मराठी इंडस्ट्रीतील माझ्या सहकलाकार आणि मित्रांना आमंत्रित करण्यात येईल असेही तिने त्यात नमूद केले. रुचिताच्या विवाहाच्या या बातमीने मराठी सृष्टीतील अनेक कलाकारांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.