आपल्या सिनेसृष्टीत प्रत्येक सणांवर आधारित चित्रपट आहेत. मग यामध्ये बहीण भावाच नात दाखवऱ्या भाऊबिजेवर आधारित चित्रपट असो किंवा नातेसंबंधांवर असो. याचप्रमाणे लोकांना सणांच महत्त्व समजावं म्हणून देखील अनेक चित्रपट बनवण्यात आले आहेत. अशातच तुम्ही ‘पंढरीची वारी’ हा चित्रपट हमखास पाहिला असेल. विठुरायाचं खरं रूप दाखवणारा हा चित्रपट असुन, या चित्रपटाचाचं एक रहस्यमयी किस्सा आहे. जो तुम्ही कदाचित कधीच एकला नसेल. तोच किस्सा आज आपण पाहणार आहोत. 1988 सालच्या ‘पंढरीची वारी’ या चित्रपटात ‘जयश्री गडकर’ या मुख्य भूमिकेत झळकल्या होत्या.

परंतू एक भीषण अपघात झाला नसता तर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत आपल्याला रंजना पाहायला मिळाल्या असत्या. रमाकांत कवठेकर दिग्दर्शित हा चित्रपट असून, या चित्रपटाची निर्मिती अण्णासाहेब घाटगे यांनी केली होती. दरम्यान रंजना यांच्याबरोबर चित्रपटाचे शूटिंग 70 टक्के पूर्ण झाले होते. हा चित्रपट बनवण्यासाठी अण्णासाहेबांनी त्यांच्या जवळ असलेले सर्व पैसे खर्च केले होते. तब्बल 18 लाख रुपये या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी घालवले होते. अशातच रंजना एका दुसऱ्या चित्रपटासाठी शूटिंगला जात असताना त्यांचा भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर रंजना यांच्यावर तब्बल 25 शस्त्रक्रिया झाल्या होत्या. परंतु हा चित्रपट रंजनानेच करावा असा अट्टाहास अण्णासाहेबांनी केला. परंतु या अपघातामुळे रंजना यांना कधीही चालता येणार नाही हे समजल्यावर अण्णांना मोठा धक्का बसला. या चित्रपटामध्ये अरुण सरनाईक हे देखील आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार होते.

परंतु अपघातात झालेल्या निधनामुळे दोन वर्ष चित्रपटाचं काम थांबून राहिलं होतं. चित्रपट पूर्ण करायचा असा ठाम निर्णय अण्णासाहेबांनी घेतला होता. त्यानंतर अण्णासाहेबांनी रंजना यांची परवानगी घेऊन ही मुख्य भूमिका जयश्री गडकर यांना दिली. रंजना यांच्याबरोबर शूट केलेल्या या चित्रपटाचे पोस्टर देखील ठरले होते. त्या पोस्टरमध्ये रंजना ‘बकुल कवठेकरला’ खांद्यावर घेऊन उभ्या असल्याचा पाहायला मिळतायत. मग काय हा चित्रपट पुन्हा नव्याने उभारण्यात आला आणि 21 डिसेंबर 1988 या दिवशी प्रदर्शित झाला. त्याकाळी हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामध्ये जयश्री गडकरी, अशोक सराफ, बकुल कवठेकर, नंदिनी जोग, आशा पाटील, सुरेश विचारे यांसारख्या कलाकारांनी साजेसा अभिनय करून प्रेक्षकांची मने जिंकली होती. या चित्रपटामध्ये बकुल कवठेकर या बालकलाकाराने विठूमाऊलीची भूमिका साकारली होती. आज आषाढी एकादशी निमित्ताने ‘पंढरीची वारी’ या चित्रपटाची ही माहित नसलेली गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.