अभिनेत्री “पद्मिनी कोल्हापुरे” यांनी वयाच्या ७ व्या वर्षापासूनच अभिनयाच्या करकीर्दीला सुरुवात केली होती. प्रेम रोग, गहराई, सत्यम शिवम सुंदरम, जिंदगी, वो ७ दिन, सौतन, इन्साफ का तराजू अशा अनेक हिट चित्रपटातून त्यांनी नायिकेची भूमिका बजावली होती. ऋषी कपूर, अनिल कपूर, मिथुन चक्रवर्ती या बॉलिवूड स्टार्ससोबत त्यांनी चित्रपटातून काम केले. हिंदी सृष्टीत नाव लौकिक केलेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी पुढे जाऊन मराठी सृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

चिमणी पाखरं हा मराठी चित्रपट अप्रतिम कलाकृती ठरला. मंथन, प्रवास असे आणखी काही मराठी चित्रपट त्यांनी साकारले. या सर्वांव्यतिरिक्त त्यांच्या आयुष्यात एक मोठी घटना देखील घडली याची चर्चा देशभर झाली. एवढेच नाही तर ही बातमी चक्क ब्रिटनमध्येही पसरली होती. त्यामुळे पद्मिनी कोल्हापूरे आणखीनच प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. पद्मिनी कोल्हापूरे यांनी ७० च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातीला बालकलाकार ते सहनायिका अशा भूमिका त्या साकारत होत्या. ८० च्या दशकात ही घटना त्यांच्यासोबत घडली होती. जेव्हा ‘प्रिन्स चार्ल्स ‘ भारत दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी चित्रपटाचे शूटिंग पाहण्याची ईच्छा व्यक्त केली होती. त्यावेळी मुंबईतील एका स्टुडिओत त्यांना नेण्यात आले. या स्टुडिओत “आहिस्ता आहिस्ता” चित्रपटाचे शूटिंग चालू होते. पद्मिनी कोल्हापूरे या चित्रपटात नायिकेची भूमिका बजावत होत्या. प्रिन्स चार्ल्स तिथे आल्यावर अभिनेत्री शशिकला यांनी त्यांचे औक्षण केले होते त्याचवेळी पद्मिनी कोल्हापूरे यांनी प्रिन्स चार्ल्सच्या गालावर किस केला होता.

पद्मिनीने किस करताच उपस्थितांमध्ये आश्चर्याचा धक्का बसला. कारण ८० च्या दशकात ही बाब साधारण समजली जात नव्हती. उघडपणे किस करणे हेच मुळात त्या काळात स्वीकारणे कठीण होते. अशातच पद्मिनीने केलेले हे कृत्य सर्व देशभर तुफान व्हायरल झाले होते. पद्मिनी कोल्हापूरे हे नाव याच कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. या घटनेनंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर्स त्यांना येऊ लागल्या होत्या. २०१३ मध्ये एका मुलाखतीत त्यांनी ही बाब मीडियाशी बोलताना सांगितली होती. त्यावेळी त्यांनी या घटनेबाबत असेही सांगितले की , जेव्हा या घटनेनंतर त्या काही कारणास्तव ब्रिटनमध्ये गेल्या होत्या त्यावेळी इमिग्रेशन ऑफिसरने त्यांना विचारले होते की, “त्या तुम्हीच होत्या का ज्यांनी प्रिन्स चार्ल्स यांचा किस घेतला होता?”….