मिस युनिव्हर्स २०२१ ची स्पर्धा सुरू झाल्यापासून यंदा तरी भारताला पहिला क्रमांक मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशात १३ डिसेंबर २०२१ रोजी मिस उनीवर्सचा निकाल लागला असून यंदा भारताच्या शिरपेचात विजयाचा तुरा रोवला गेला आहे. तब्बल २१ वर्षांनंतर भारताने हे यश संपादन केले आहे. भारताच्या हरनाझ संधूनं हा किताब जिंकला आहे. तब्बल २१ वर्षांनंतर भारताला मिस युनीवर्सचा किताब मिळाल्यामुळे साऱ्यांचीच मान अभिमानाने उंचावली आहे. भारतात सध्या या विजयामुळे जल्लोष आणि उत्साहाचं वातावरण पसरलं आहे.

या आधी भारताने साल २००० रोजी मिस युनीवर्सचा कीताब जिंकला होता. त्यावेळी लारा दत्तामुळे हे यश संपादन करता आलं होतं. तेव्हा पासून भारताकडून अनेक महिलांना मिस युनिवर्समध्ये सहभाग घेतला होता खर मात्र साऱ्यांच्याच पदरी अपयश आले. हरनाझ संधूनं यासाठी खूप मेहनत घेतली. किताब जिंकल्यानंतर तिने आपले मत व्यक्त करताना सांगितले की, “मी देवाची खूप ऋणी आहे. तसेच मी माझ्या आई वडिलांचे देखील आभार मानते. माझ्या आई वडिलांनी मला योग्य दिशा दाखवली स्पर्धा जिंकण्यासाठी धीर दिला त्यासाठी त्यांचे खरोखरच धन्यवाद.” पुढे मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन विषयी बोलताना ती म्हणाली की, “मिळवलेल्या यशामध्ये मी मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनचे देखील आभार मानते.” हरनाझ संधू ही एक मॉडेल आहे.

लहानपणापासूनच हरनाझ संधू हि हुशार विद्यार्थिनी राहिली आहे. अशात तिने आजवर अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला असून विजय देखील मिळवला आहे. तिने २०१७ साली “टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड” त्यानंतर २०१८ साली “मिस मॅक्स इमर्जिंग स्टार” २०१९ साली “फेमिना मिस इंडिया पंजाब” आणि आता २०२१ साली “मिस युनिवर्स इंडिया” अशा एकूण चार किताबांवर स्वतःचं नाव कोरलं आहे. हरनाझ संधू ही मूळची चंदिगडची आहे. मॉडलिंग करता करता तिने काही पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. तिने नुकताच केलेला १ पंजाबी चित्रपट प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर आहे. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने केलेली धडपड मोठी कौतुकास्पद आहे.