पैसा, प्रसिद्धी आणि नाव कमवायला अनेक वर्ष लागतात त्यासाठी वर्षानुवर्षे घेतलेली मेहनत एका निर्णयामुळे धुळीस मिळू शकते याच उत्तम उदाहरण म्हणजे अभिनेत्री मानसी नाईक आणि पती प्रदीप खरेरा यांच्यातील वाद. खरंतर हे दोघेही आपापल्या क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत. जानेवारी २०२१ मध्ये ह्या दोघांनी लग्नगाठ बांधली. पण अवघ्या २ वर्षांच्या आतच ह्या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्री मानसी नाईक हिने वयाच्या २० व्या वर्षांपासून मराठी चित्रपट आणि गाण्यांमध्ये आपला सहभाग दर्शवला. २०१० मध्ये तिचे “तुक्या तुकविला नाक्या नाचविला” आणि “टार्गेट” असे २ मराठी चित्रपट रिलीज झाले. कुटुंब, फक्त लढा म्हणा, कोकणस्थ, हुतूतू, मर्डर मेस्त्री, ढोलकी, भविष्याची ऐशी तैशी, स्माईल प्लिज” अश्या अनेक चित्रपटात तिने महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. इतकंच नाही तर “चार दिवस सासूचे” आणि “चला हवा येऊ द्या” अश्या प्रसिद्ध शो आणि मालिकां मध्ये तिने अभिनय साकारला होता.

“बघतोय रिक्षावाला”, “बाई वाड्यावर या” यांसारखे अनेक आयटम सॉंग आणि मुसिक अल्बम मध्ये देखील ती झळकली तिची इतकी प्रसिद्धी पाहता तिला दांडिया आणि दही हंडी सारख्या अनेक कार्यक्रमांत प्रमुख पाहुनी कलाकार म्हणून आमंत्रित देखील केलं गेलं आहे. तर इकडे तिचा पती प्रदीप खरेरा हा देखील खूपच प्रसिद्ध व्यक्ती आहे. प्रदीप खरेरा हा प्रोफेशनल इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्याने जागतिक स्पर्धेत एशियन चॅम्पियनशिप जिंकली होती. शिवाय त्यात भारताचं प्रतिनिधित्व देखील त्याने केलेलं पाहायला मिळालं. इतकंच नाहीतर “तुफान” या बॉलीवूड चित्रपटात फरहान अख्तर सोबत काम केलं आहे. या चित्रपटात त्याने प्रोफेशनल बॉक्सरचा रोल निभला ज्याची अनेक बॉलिवूड कलाकारांनी स्तुती देखील केलेली पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी आग लगेगी या गाण्यातही तो झळकला होता. इतकं सगळं करून आज एक विशिष्ट उंची गाठून पैसा आणि प्रसिद्धीच्या झोतात असताना ह्या दोघांनी काही कारणास्तव एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. सुरवातीला त्यांनी एकमेकांबद्दल बोलणं टाळलं होत. पण अभिनेत्री मानसी नाईक हिने मीडिया समोर आमचा डिव्होर्स होतोय आणि त्यासाठी मी अर्ज देखील केला आहे असं सांगितलं. यांनतर मानसी प्रदीपवर आरोप देखील करताना पाहायला मिळाली. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो आम्ही लिव्ह इन रिलेशनशिपमध्येही राहिलो. नंतर आम्ही लग्न केलं पण केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि पैसा मिळवण्यासाठी त्यांनी माझा वापर केला.

जोपर्यंत त्याच्याकडून पैसे मिळतात, प्रसिद्धी मिळत जाते त्याच्याकडून जेवढं काही घेता येईल तेवढं ते घेतात , तोपर्यंत ती व्यक्ती तुमच्याशी चांगलं वागते. नेमकं असंच काहीसं माझ्याही बाबतीत घडलं. त्याच्याबद्दल मला आताच खूप काही बोलता येणार नाही पण येत्या काही दिवसात मी ह्या सर्व गोष्टी लवकरच उघड करणार आहे.असं ती म्हणाली होती. मग काय प्रदीप देखील सोशल मीडियावर मानसी आणि त्याच्या नात्याबद्दल बोलताना दिसला. सोशल मीडियावर गाण्यात तो रडताना देखील पाहायला मिळाला. एकमेकांशी बोलण्यापेक्षा ते सोशल मीडियावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना पाहायला मिळाले. आता तर हा वाद इतका विकोपाला गेला कि कोवळ्या पोरी फिरवतो पार्ट्या करतो आणि खोटं प्रेम करून मला वापरलं ह्या खालच्या पातळीवर बोलायला देखील हे मागे पुढे पाहत नाहीत. पण ह्यासगळ्यात कोणाला काडीमात्र इंटरेस्ट नाही. लोक फक्त हसतात आणि मजा बघतात ह्यापेक्षा दुसरं काही होत नाही. इतका पैसा, प्रसिद्धी आणि नाव कमवायला तो अश्या गोष्टीत अडकून वाया घालू नये. डिव्होर्स याआधी देखील अनेकांचे झाले आहेत पण त्यासाठी कोणी सोशल मीडियावर व्यक्त होऊन आरोप प्रत्यारोप करून स्वतःच हसू करून घेत नाही. ह्यांनी पुन्हा एकदा विचार करून आत्म चिंतन करणं खूपच गरजेचं आहे.