झी वाहिनीवर काल १६ ऑगस्ट रोजी ती परत आलीये ह्या मालिकेचा पहिला भाग प्रकाशित करण्यात आला. मालिकेतील पहिल्याच भागात मालिकेचा दर्जा चांगला असल्याचं जाणवतं. मालिकेतील मुख्य कलाकार विजय कदम ह्यांच्या अफलातून अभिनयामुळे ह्या मालिकेला विशेष रंग चढला आहे. अनेक वर्षांनी त्यांनी पुन्हा छोट्या पडद्यावर एन्ट्री घेतलेली पाहायला मिळाली. उतारवयातही त्यांच्या अभिनयात कसलीही उणीव जाणवली नाही. अभिनेत्री “कुंजीका काळवींट” हिच्या अभिनयाची देखील चर्चा होताना पाहायला मिळतेय. मालिकेत तिनेदेखील उत्तम अभिनय केलेला पाहायला मिळतोय. अभिनेता विजय कदम ह्यांच्या बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत…

अभिनेते विजय कदम हे उत्तम अभिनेते असून त्यांनी आजवर अनेक चित्रपट आणि नाटकांत कामे केली आहेत. टोपी घाला रे बच्चे सबसे अच्छे,मधुचंद्राची रात्र, देखणी बायको नाम्याची, तोचि एक समर्थ अशा अनेक मराठी चित्रपटात काम करून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. विजय कदम यांनी ‘हळद रुसली कुंकू हसलं’ या चित्रपटात अभिनेत्री अश्विनी भावेच्या पतीची भूमिका साकारली. सही दे सही, टूर टूर, पप्पा सांगा कुणाचे ही त्यांची नाटके देखील तुफान गाजली. अनेकांना हे माहित नसेल कि अभिनेते विजय कदम ह्यांनी प्रेम विवाह केला असून त्यांची पत्नी देखील मराठी अभिनेत्री आहेत. होय विजय कदम ह्यांच्या पत्नी पद्मश्री जोशी ह्या देखील अभिनेत्री आहेत. विजय कदम आणि पद्मश्री जोशी ह्यांनी नाटकात एकत्रित कामे देखील केली आहेत. विजय कदम यांनी दोनदा प्रपोज करूनही त्यांनी लग्नाला नकार दिला होता परंतु “विच्छा माझी पुरी करा” या नाटकातील विजय कदम यांनी साकारलेल्या भूमिकेमुळे त्या त्यांच्या प्रेमात पडल्या आणि आपला होकार कळवला. नणंद भावजय , पोरीची धमाल बापाची कमाल, नवलकथा या चित्रपटात पद्मश्री जोशी ह्यांनी अभिनय साकारला आहे.

सध्या पद्मश्री जोशी ह्या चित्रपट आणि नाटकांपासून थोड्या दूरच पाहायला मिळतात. काही दिवसांपूर्वी चला हवा येऊ द्या च्या सेटवर दोघांनी जोडीने हजेरी लावलेली पाहायला मिळाली होती. बऱ्याच कमी लोकांना हे माहित असेल कि विजय कदम ह्यांच्या पत्नी पद्मश्री जोशी आणि पल्लवी जोशी ह्या सक्क्या बहिणी आहेत. तर संगीत शिक्षिका सुषमा जोशी या अभिनेत्री पद्मश्री जोशी यांच्या आई. सुषमा जोशी ह्यांना दोन मुली पद्मश्री, पल्लवी आणि एक मुलगा मास्टर अलंकार. मास्टर अलंकार हा देखील एक उत्तम अभिनेता आहे पण आता तो अभिनयापासून दूर जाऊन स्वतःचा मोठा बिजनेस सांभाळत आहे. विजय चव्हाण ह्यांच्या पत्नीची बहीण ह्या नात्याने पल्लवी जोशी ह्या विजय कदम ह्यांच्या नात्याने मेव्हणी आहेत. असो अभिनेते विजय कदम ह्यांना ती परत आलीय ह्या मालिकेसाठी खूप खूप शुभेच्छा…