Home Entertainment कुणी तरी येणार येणार गं..! या मराठी अभिनेत्रीने शेअर केले डोहाळे...

कुणी तरी येणार येणार गं..! या मराठी अभिनेत्रीने शेअर केले डोहाळे जेवनाचे फोटो

12071
0
dipashree mali dohale jevanphoto

मराठी मालिका अभिनेत्री “दिपश्री माळी” हिने नुकत्याच पार पडलेल्या आपल्या डोहळजेवणाचे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत. तिच्या या फोटोंवर सुयश टिळकसह अनेक सहकलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. साधारण चार वर्षांपूर्वी दिपश्रीने अमेय माळीसोबत लग्न केले होते. आपला संसार सांभाळत मधल्या काळात तिने अभिनयाची आवड जोपासावी म्हणून मालिकांमध्ये काम केले होते. गर्ल्स हॉस्टेलह्या मालिकेत तिने केलेलं काम सर्वानाच आवडलं होत.

dipashree mali dohale jevan
dipashree mali dohale jevan

दिपश्री माळी ही मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री असून ‘एक घर मंतरलेलं ‘ या मालिकेत तिने अभिनय साकारला होता. ही मालिका झी युवा वाहिनीवर प्रसारित केली जात होती. अभिनेत्री सुरुची अडारकर आणि सुयश टिळक यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका बजावली होती. एकत्रितपणे त्यांनी साकारलेली ही दुसरी मालिका ठरली होती. या मालिकेतून दिपश्री छोट्या पडद्यावर झळकली होती. याशिवाय झी युववरील “गर्ल्स हॉस्टेल” ही आणखी एक मालिका तिने अभिनित केली आहे. दिपश्री सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे. दरवेळी ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नवनवीन पोस्ट, आठवणी शेअर करत असते. दपश्रीला तिच्या आयुष्याच्या या गोड प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here