झी मराठी वाहिनीवरील 2018 साली प्रदर्शित झालेल्या ‘कानाला खडा’ या कार्यक्रमामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. अशातच बोल्ड बिंदास्त आणि ब्युटीफूल सई ताम्हणकर या अभिनेत्रीला देखील बोलावलं गेलं होतं. दरम्यान सईला तिच्या खासगी आयुष्याबद्दल काही प्रश्न विचारले गेले. तेव्हा सईने स्वतःच्या मॅरेज स्टेटसबद्दल एक खुलासा करून चाहत्यांना धक्का दिला आहे. सईच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अमेय गोसावी नामक व्यक्तीसह सईने लग्न गाठ बांधली होती. मात्र त्या दोघांचं नातं फार काळ टिकले नाही. कार्यक्रमादरम्यान खाजगी आयुष्याबद्दल सांगत सई म्हणाली होती की,” मी आधी सांगलीमध्ये राहायचे. त्यानंतर मी थेट मुंबईमध्ये आले आणि माझा मुंबई पुणे प्रवास जास्त प्रमाणात सुरू झाला. माझे सगळे मित्र पुण्यामध्ये शिफ्ट झाले असल्याने मी सुद्धा पुण्यामध्ये जास्त येणं जाणं करायचे. एवढंच नाही तर माझं पहिलं घर पुण्यामध्येच आहे”.
पुढे सई म्हणते मुंबईमध्ये आली असताना माझ एका व्यक्तीबरोबर अफेअर होतं”.,”एक खूप देखणा पहिलवान माझ्या आयुष्यामध्ये होता”. असं सांगून सईने स्वतःच्या खाजगी आयुष्याबद्दल खुलासा केला. कार्यक्रमाला रंगत आली ती म्हणजे तिच्या चेहऱ्याच्या वेगवेगळ्या माशांनी. तिने हॅपी फिश, अँग्री फिश, सॅड फिश अशा मास्यांचे तोंडाचे हावभाव करत स्वतःमधील कला सादर केली. तिच्या या विनोदी कलेमुळे चाहतेमंडळी पोट धरून हसले. त्याचबरोबर सईने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मध्यंतरी ती प्रेक्षकांना भाडीपाच्या सीझनमध्ये पाहायला मिळाली. सई सध्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे.