आजकाल अनेक कलाकार मंडळी मोठमोठ्या मॉलमध्ये, शॉपिंग स्टोअरमध्ये खरेदी करण्यासाठी जातात. कलाकाराने एन्ट्री घेताच आसपास असणाऱ्या व्यक्ती तसेच तेथे काम करणारी माणसं सेल्फी आणि ऑटोग्राफ घेण्यासाठी कलाकारांच्या भोवती गर्दी करतात. एवढेच नाही तर त्यांना एखादी गोष्ट घेण्यासाठी मदत देखील करतात. परंतु ही स्पेशल ट्रीटमेंट प्रत्येक कलाकाराबरोबर होतेच असं नाही. मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ या मालाड मधील मॅक्स शॉपिंग स्टोर येथे गेल्या होत्या. तिथे असताना त्यांना विचित्र पद्धतीने ट्रीट केलं गेलं. तो अनुभव सांगत त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे.
10 जूनला म्हणजेच कालचा शनिवारी निवेदिता सराफ या मालाडमधील मॅक्स स्टोअर येथे गेल्या होत्या. तिथे उपस्थित असणाऱ्या स्टाफकडून त्यांना अत्यंत वाईट अनुभव आला. अशातच त्यांनी मॅक्स स्टोअरमध्ये एक फोटो क्लिक करून भल्यामोठ्या कॅप्शनसह इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्या म्हणतात की,”नमस्कार मी इन्फिनिटी 2 मालाडमधील मॅक्सस्टोअर येथे शॉपिंग करायला गेले होते. तिथे उपस्थित असणाऱ्या स्टाफकडून मला अत्यंत वाईट अनुभव आला. त्यांनी मला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही. तुम्ही तिथे काही खरेदी करत आहात की नाही याची त्यांना अजिबात काळजी नव्हती. ते कोणत्याही प्रकारची मदत करण्यासाठी तयार नव्हते. तितक्यात एक मुलगी बाहेर येऊन एका सेल्समनला म्हणाली की मला वेळ नाही आहे. तेव्हा त्या व्यक्तीने मला ओळखलं आणि माझी माफी मागायला सुरुवात केली.
त्यानंतर त्यांनी लगेचच मॅनेजरला फोन केला. माझ्या चेहऱ्याची ओळख असल्यामुळे मला चांगली वागणूक नको आहे. परंतु मला एक चांगली वागणूक हवी आहे कारण की मी एक सामान्य ग्राहक म्हणून त्यास पात्र आहे. एवढेच नाही तर या दुकानात पाय ठेवणारी प्रत्येक व्यक्ती त्याला पात्र आहे”. त्यांच्या या पोस्टला अनेक सेलिब्रेटींनी आणि सामान्य व्यक्तींनी प्रतिसाद दिला आहे. त्यांना देखील अशा पद्धतीचा अनुभव येत राहतो असं अनेक युजर्स म्हणतायत. निवेदिता सराफ यांच्यासारख्या प्रेमळ आणि चांगल्या अभिनेत्रीला अशा पद्धतीची वागनुक मिळाल्यामुळे नेटकरी संतापले आहेत.