2021 मध्ये कलर्स मराठी या वाहिनीवर सर्वोत्तम प्रसारित झालेला आणि प्रेक्षकांची नजर खीळवून ठेवणारा कार्यक्रम म्हणजे ‘आपलं मराठी बिग बॉस’. अशातच बिग बॉस मराठी सीजन 3 च्या पहिल्या रनरअपने म्हणजेच जय दुधाने याने बिग बॉसची ट्रॉफी जिंकुन ताठ मानेने बिगबॉसचं घर सोडलं. जय त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नेहमी कोणती ना कोणती व्हिडिओ पोस्ट करत असतो. दरम्यान त्याने त्याच्या आवडत्या व्यक्तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते एक व्हिडिओ शेअर केली आहे
जयने नुकतचं इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या आवडत्या व्यक्तीला ‘हॅपी बर्थडे टू माय फेवरेट पर्सन’ असं म्हणत व्हिडिओ शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये हर्षाला पाटील नावाची व्यक्ती दिसत आहे. या व्हिडिओमध्ये हर्षला पाटील आणि जय एकमेकांसोबत डान्स करताना दिसत आहे. या दोघांचा व्हिडिओ तुफान वायरल झाला असून चाहत्यांनी भरभरुन कॉमेंट केल्या आहेत. त्या दोघांना एकत्र पाहून अनेक व्यक्तींनी अशी कमेंट केली आहे की,” ही मुलगी नेमकी कोण आहे”. तर एकजण म्हणतोय “तुम्ही दोघे एकमेकांसोबत फार छान दिसता”. एकाने तर अशी कमेंट केली आहे की,” हॅपी बर्थडे वहिनी”. या दोघांना एकत्र पाहून अनेकजण आश्चर्यचकित झाले असून, हे एकमेकांना डेट करत आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
हर्षला पाटील ही एक व्हिडिओ क्रिएटर असून ती कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. हर्षदाने देखील तिच्या वाढदिवसानिमित्त ‘बर्थडे बिहेवियर’ असं कॅप्शन देत इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचाच एक बोल्ड आणि हॉट अंदाजामधिल व्हिडिओ शूट करून पोस्ट केला आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. त्याचबरोबर हर्षलाचा इंस्टाग्रामवर खूप मोठा चाहतावर्ग आहे. त्याचबरोबर जय दुधाने आणि हर्षला यांच्यामध्ये नेमकं कोणत्या प्रकारचं बॉण्डिंग आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.