गौतमी पाटील जिचं नृत्य पाहायला तरुणवर्ग लांबून लांबून येऊन आवर्जून हजेरी लावतात. महाराष्ट्रात कुठेही तिचे नृत्याचे कार्यक्रम असतील तरुणवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. आता गौतमी एक मराठी चित्रपट देखील करत असल्याची बातमी येत आहे ह्या बातमीने तिचे चाहते भलतेच खुश झालेले पाहायला मिळत आहे. “घुंगरू” असं ती साकारत असलेल्या चित्रपटाचं नाव आहे. लवकरच ह्या चित्रपटाचं शूटिंग सुरु होणार आहे. गौतमी पाटील ह्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे. स्टेज गाजवणारी गौतमी लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार हे पाहून तिचे चाहते तिला सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत. पण गेल्या एक दोन महिन्यात तिने अश्लील पद्धतीने केलेलया डान्सवर अनेकांनी आक्षेप घेतला गेला होता. यामुळे ती आणखीनच चर्चेत आली होती ह्या चर्चेमुळेच तिला हा चित्रपट मिळाला असल्याचं बोललं जातंय.
अभिनेत्री मेघा घाडगे हिने गौतमीच्या लावणीच्या अदांवर कक्षेत दर्शवत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पुढे लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर आणि मेघा घाडगे यांनी तिला झालेल्या प्रकाराबाबत माफी मागायला लावली होती. राजकीय व्यक्ती आणि दिग्गज कलाकारांच्या पुढे झुकून तिने सर्वांच्या पुढे जाहीर माफी मागत यापुढे माझ्याहातून कसलीही अश्लील कृत्य होणार नसल्याचं तिने म्हटलं होत. झालेल्या प्रकाराबाबद तिने माफी मागील असल्याने ती भलतीच चर्चेत आली होती ह्या चर्चेचा तिला मोठा फायदा देखील झाला. अनेक ठिकाणी तिच्या चाहत्यांसाठी कार्यक्रमांसाठी तिला आवर्जून बोलावलं जाऊ लागलं. आता तर चक्क मराठी चित्रपटातच ती पाहायला मिळणार आहे. तिच्या कार्यक्रमांवर आता बंदी घालावी अशी मागणी होत असताना तीच वक्तव्य चर्चेत येत आहे. ती म्हणते, ” माझी नृत्याची कला मी सादर करते त्यात कोणत्याही प्रकारचे अश्लील हावभाव नाहीत, महिला देखील माझ्या कार्यक्रमाला हजेरी लावतात. आधी झालेल्या चुकीबद्दल मी जाहीर माफी मागितली आहे. आता त्यात मी सुधारणा देखील केली आहे. माझ्या कार्यक्रमावर अशी बंदी घालणे योग्य नाही.” बॅक आर्टिस्ट पासून सुरुवात करत आता प्रमुख कलाकार बनलेल्या गौतमीने तिचा “घुंगरू” चित्रपट आवर्जून पाहण्याचं आवाहन देखील केलं आहे.