बिगबॉसची स्पर्धक अभिनेत्री तेजस्विनी लोणारीची पोस्ट पुन्हा चर्चेत

हाताच्या दुखापतीमुळे बिगबॉसच्या घरातून बाहेर पडलेली अभिनेत्री तेजस्विनी लोणारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी तिने तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले होते. आपल्या चाहत्यांना तिने नुकतीच एक पोस्ट लिहली होती ती म्हणाली कि, “जेंव्हा सगळंच संपलय असं आपल्याला वाटून जातं, तेव्हा तिचं खरी वेळ असते नवं काहीतरी सुरु होण्याची! गुरुवारी हात फॅक्चर झाला होता, आणि आज गुरुवारीच तो बरा देखील झाला आहे. आयुष्यातील खडतर प्रवासात तुम्हा लोकांची ज्यापद्धतीने मला साथ लाभली आहे, ते पाहता माझ्यासारखा भाग्यवान दुसरा कोणी नसेल! तुमचे मनापासून आभार.” तिच्या चाहत्यांना तिने ह्या पूर्वीच मी बिग बॉसच्या घरात येण्यास उत्सुक असल्याचं सांगितलं होत. आता तिच्या ह्या पोस्टमुळे ती पुन्हा घरात प्रवेश घेते कि काय असा प्रश्न उपस्तित होत आहे.

actress tejaswini lonari bigboss
actress tejaswini lonari bigboss

काही दिवसांपूर्वी तिने हाताच्या दुखापतीवर एक पोस्ट लिहली तोटी त्यात तिने सांगितलं होत कि” माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनो तुम्ही खूप मजेत असाल अशी मी अपेक्षा करते. माझ्या तब्येतीची विचारपूस करणारे अनेक संदेश मला तुमच्याकडून मिळाले. माझ्या बोटाची शस्त्रक्रिया झाल्याचा गैरसमज अनेकांना होत असल्याचे मला समजले. मुळात, तसं काहीही झालं नाही. माझ्या हाताला किरकोळ फ्रॅक्चर झाले असून, ते काही आठवड्यात भरून निघेल. त्यामुळे शस्त्रक्रियेची गरज नाही असे माझ्या डॉक्टरांनी सांगितले. आता तीन आठवडे झाले असून बऱ्यापैकी सुधारणादेखील होत आहे. लवकरच एकदम तेजस्वी तेजस्विनी तुम्हाला परत एकदा दिसून येईल. तुमचं माझ्यावरच प्रेम असंच राहू द्या.” आता तिच्या हाताची दुखापत पूर्णपणे बारी झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे तेजस्विनी पुन्हा बिगबॉसच्या घरात प्रवेश करेल अशी आशा आहे. बिगबॉसचे प्रेक्षक आणि तिचे चाहते ती पुन्हा घरात यावी ह्यासाठी तिला प्रोत्साहन देत सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत.

Leave a Comment