‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम अरूण कदम शोधतायत जून्या काळातली पाळणा… नेमक काय आहे करणं जाणून घ्या

अनेक कलाकार मंडळी सोशल मीडियावर काही ना काही कारणामुळे ऍक्टिव्ह असतात. अशातच कॉमेडीचा अलगहृदम अरुण कदम यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हॅण्डलवर पत्नीसोबतची खास एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट पाहून त्यांच्या चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये कहर केला आहे. ही व्हिडिओ अरुण कदम यांनी एका खास कारणामुळे पोस्ट केली आहे. नेमकं काय कारण आहे जाणून घेऊ. नुकताच अरुण कदम यांच्या मुलीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. घरामध्ये येणाऱ्या नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी अरुण कदम आणि त्यांची संपूर्ण फॅमिली एकत्रित आली होती. हा कार्यक्रम अगदी जल्लोषात पार पडला.

arun kadam daughter baby shower photos
arun kadam daughter baby shower photos

दरम्यान अरुण कदम यांनी त्यांच्या पत्नीसोबत एक इंस्टाग्रामरील काढून तो व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. ‘केवड्याचे पान तू कस्तुरीचं रान तू’ हे गाणं व्हिडिओला बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून दिलं आहे. अरुण कदम यांची पत्नी दिसायला फारच सुंदर आहे. सोबतच त्या त्यांच्या कुरळ्या केसांमध्ये फारच आकर्षक दिसत आहे. अरुण कदम यांनी पांढऱ्या रंगाचा सदरा आणि त्यावर भगव्या रंगाचं नक्षीदार जॅकेट परिधान केलं आहे. कार्यक्रमादरम्यान अरुण कदम यांनी त्यांची मुलगी, जावई आणि पत्नीसह एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.

arun kadam daughter
arun kadam daughter

मुलाखत देताना अरुण कदम सांगत होते की,” आमच्या घरी नवा पाहून येणार याचा विचार करूनच मला फार छान वाटत आहे. घराबाहेर पडल्यावर दुकानातून जाताना आम्ही बाळासाठी पाळणा शोधत असतो. बाळासाठी काय करू आणि काय नको असं मला झालं आहे”. अरुण कदम यांना त्यांच्या होणाऱ्या नातवासाठी जुन्याकाळातील सुंदर पाळणा घ्यायचा आहे. सोबतच अरुण कदम यांची मुलगी दिसायला फारच गोड आहे. दरम्यान मुलाखत देताना अरुण कदम यांच्या मुलीने तिच्या हटके ब्लाऊजची झलक दाखवली आहे. तिने एका डिजाइनर कडून खास ब्लाउज शिवून घेतला आहे. या ब्लाऊजच्या मागील बाजूस तिचा आणि तिच्या नवऱ्याचा फोटो दिसत आहे. एवढेच नाही तर तिच्या नवऱ्याने परिधान केलेल्या सदऱ्यावर देखील त्या दोघांचा फोटो पाहायला मिळत आहे.

Leave a Comment