अभिनेत्री तेजस्विनी बिगबॉसच्या खेळामुळे चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. पण खेळ खेळताना हाताला झालेल्या बाहेर जावं लागलं. पण त्यामुळे तिचे अनेक चाहते नाराज देखील झाले होते. काही दिवसांनी तिचा हात देखील पूर्णपणे बरा झाला आता तेजस्विनी पुन्हा सहभागी होऊन खेळ खेळताना पाहायला मिळणार अशी प्रेक्षकाना आशा असतानाच तिने आता वेळ निघून गेली आहे पुढच्या सिजनला जर मला खेळायला मिळालं तर मी नक्की येईल असं म्हणत तिने प्रेक्षकांचा निरोप घेताना होता. आता नुकतीच तिने आपल्या चाहत्यांसाठी एक मोठी खुशखबर दिली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तिने काही फोटो शेअर करत प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे.
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिने मकरंद अनाजपूरें ह्यांच्या सोबतचे काही फोटो शेअर केले आहेत त्यात ती म्हणते” वयाच्या सोळाव्या वर्षांपासुन मला जे गुरु आणि सहकलाकार म्हणून लाभलेले मकरंद अनाजपूरें sir , ज्यांच्याबरोबर पाच चित्रपट करण्याचा योग आला आणि त्या चित्रपटांमुळे जी प्रसिद्धी मिळाली आता हीच जोडी तुमच्यासाठी घेऊन येत आहे 6th from the Instalment…धमाकेदार चित्रपट….Stay Tuned. ” असं म्हणत तिने आपल्या नव्या चित्रपटाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिच्या ह्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे. अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आणि मकरंद अनाजपूरें ह्यांना नव्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा…