महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम दत्तूचा जबरदस्त स्वॅग… डॉक्टर असलेल्या बायकोसाठी उखाणा घेत म्हणाला

2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘पुष्पा द राइज’ या बॉलीवूड चित्रपटातील फेमस डायलॉगबाजीने तरुणाईला वेड लावून ठेवलं होतं. प्रत्येक तरुण पुष्पाचे डायलॉग मारून स्वतःला अल्लू अर्जुन समजत होते. अशातच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ‘दत्तू मोरे’ हा नुकताच विवाहबद्ध झालेला आहे. दत्तूचा आणि त्याच्या पत्नीचा पुष्पा स्टाईलमध्ये उखाणा घेतानाचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय. मागील महिन्याच्या 23 तारखेला दत्तू विवाहबद्ध झाला. त्याच्या पत्नीचे नाव स्वाती असे असून, या दोघांचा एकमेकांना घास भरवून उखाणा घेतानाचा व्हिडिओ दत्तूने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये दत्तूने अगदी फिल्मी स्टाईलमध्ये उखाणा घेऊन चहात्यांची मने जिंकली आहेत. उखाणा घेत दत्तू म्हणाला,” लग्न होतं कोर्टात कोर्टात नव्हता बँडवाला, स्वातीचं नाव घेतो झूकेगा नही साला”. दत्तूचा हा फिल्मी अंदाजातील उखाणा स्वातीला फारच भावला.

datta more with wife swati
datta more with wife swati

दत्तू आणि स्वाती हे दोन कपल एकमेकांना फार कॉम्प्लिमेंट करत असतात. आता नवऱ्याने उखाणा घेतला आहे म्हटल्यावर नवरीचा उखाणा तर झालाच पाहिजे. स्वातीने देखील जबरदस्त उखाणा घेऊन दत्तूला इम्प्रेस केलंय. “राधा म्हणते कृष्णाला हास, दत्तात्रय रावांना भरवते मी प्रेमाचा घास”. तिचा हा प्रेमळ उखाणा ऐकून दत्तूला फारच छान वाटलं. वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये स्वाती म्हणतीये की,” प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं कि तीला लग्नाच्या एक दिवस आधी हळद लागावी. परंतु काही प्रमाणात माझ्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता”. त्यानंतर ती पुढे असंही म्हणते की,” मला तर माझ्या लग्नाच्या आदल्यारात्री तीन वाजता हळद लागली”. व्हिडिओमध्ये असं दिसतंय की ते दोघं केळवण्यासाठी बसले आहेत. परंतु हे केळवन लग्नानंतरच असल्याचं दिसतंय. अशा पद्धतीच्या गप्पा रंगवून दत्तूचं आणि स्वातीचं केळवण पार पडलं.

Leave a Comment